Digital payments : भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या (Digital payments) क्षेत्रात एक नवीन विक्रम नोंदवला गेला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित दैनंदिन व्यवहारांनी प्रथमच 700 दशलक्षांचा (70 कोटी) टप्पा ओलांडून 707 दशलक्ष व्यवहारांचा टप्पा गाठलाय. 2 ऑगस्ट 2025 रोजी टप्पा गाठण्यात आला.
कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या महायुती सरकार विचाराधीन; अदिती तटकरे
2016 मध्ये सुरू झालेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्रणालीने आतापर्यंत देशात 50 कोटींहून अधिक सक्रिय युजर्स जोडले आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये, UPI दररोज सुमारे 350 दशलक्ष व्यवहार नोंदवत होते, जे ऑगस्ट 2024 मध्ये 500 दशलक्ष दैनिक व्यवहारांपर्यंत वाढेल.
गेल्या दोन वर्षांत UPI व्यवहारांची संख्या दुप्पट:
ऑगस्ट 2023: दररोज सुमारे 350 दशलक्ष (35 कोटी) व्यवहार
ऑगस्ट 2024: दररोज 500 दशलक्ष (50 कोटी) व्यवहार
ऑगस्ट 2025: दररोज 707 दशलक्ष (70 कोटी) व्यवहार
याशिवाय, गेल्या महिन्यात UPI वर 19.5 अब्ज (1,950 कोटी) व्यवहार झाले आहेत ज्यांची एकूण किंमत 25 लाख कोटी रुपये होती. याचा अर्थ, सरासरी दररोज 650 दशलक्ष व्यवहार आणि 83,000 कोटी रुपये मूल्याचे व्यवहार होत होते.
शाळेतील मध्यान्ह भोजनातील विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी काय आहेत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना?
दरम्यान, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट असोसिएशनच्या मते, पुढील वर्षी एक अब्ज व्यवहार साध्य करण्यासाठी UPI च्या व्यवसाय मॉडेलने व्यापारी सवलत दर (MDR) पुन्हा सुरू करावेत. त्यांनी सरकारला प्रमुख व्यापारी आणि उच्च-मूल्याच्या व्यवहारांसाठी सीमान्त MDR स्थापित करण्याची विनंती केली.
UPI चा भारतातील प्रभाव
• डिजिटल पेमेंट्समधील वर्चस्व: भारतातील 85% डिजिटल व्यवहार UPI द्वारे होतात. जगभरातील रिअल-टाइम डिजिटल पेमेंट्सपैकी जवळपास 50% UPI च्या माध्यमातून होतात.
•कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल: UPI मुळे शहरांमध्ये रोखीच्या वापरात मोठी घट झाली आहे. ग्रामीण भागातही हळूहळू UPI चा वापर वाढत असल्याने भारत ‘कॅशलेस अर्थव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे.
•व्यापारी आणि ग्राहकांचा फायदा: सध्या 34 कोटींहून अधिक QR कोड्स दुकानांमध्ये आणि व्यापारी ठिकाणी उपलब्ध आहेत.