Download App

मोठी बातमी! देशभरात UPI सेवा ठप्प, गुगल पे, फोन पे बंद; युजर्सचा संताप, घडलं काय?

UPI सर्व्हिसमध्य आज मोठा तांत्रिक बिघाड झाला. हजारो (UPI Down) युजर्सना मोठा मानसिक ताण सहन करावा लागला.

UPI Down : UPI सर्व्हिसमध्य आज मोठा तांत्रिक बिघाड झाला. हजारो (UPI Down) युजर्सना मोठा मानसिक ताण सहन करावा लागला. पेमेंट आणि फंड ट्रान्सफर संबंधी अनेक अडचणी युजर्सना सहन कराव्या लागल्या. यामध्ये गुगल पे आणि फोन पे यांचा समावेश होता. यामुळे युजर्सना मोठा त्रास सहन करावा लागला. युजर्सने सोशल मिडियावरुन या गोष्टी समोर आणल्या. अनेकांनी एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अडचणी सांगितल्या. युपीआय पेमेंट सर्व्हिस आउटेज का झालं, यामुळे किती लोकांना त्रास सहन करावा लागला याची माहिती घेऊ या..

Downdetector च्या रिपोर्टनुसार आज सायंकाळी 7 वाजल्यापासूनच अडचणी येत होत्या. जवळपास 23 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या. यात अनेकजण असे होते ज्यांना पैसे सेंड करण्यात तर काही जणांना पैसे रिसीव करण्यात अडचणी येत होत्या. या आउटेजमुळे 82 टक्के युजर्सना पेमेंट करण्यात अडचणी येत होत्या. तसेच 13 टक्के युजर्सना फंड ट्रान्सफर करण्यात आणि 4 टक्के युजर्सना मोबाइल अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; UPI वर पेमेंट घेणे ठरणार फायद्याचं; 2 हजारांपर्यंतच्या व्यवहारावर मिळणार इंसेंटिव्ह

UPI लोकप्रिय डिजिटल पेमेंट सर्व्हिस

भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट सर्व्हिस आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून दररोज कोट्यावधी भारतीय मोबाइल फोनच्या माध्यमातून कोणत्याही अडचणीविना काही सेकंदात पैसे पाठवतात आणि खात्यात जमा होतातही. या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर यांसह अन्य प्रकारचे व्यवहार करता येतात.

बातमी अपडेट होत आहे..

follow us