Download App

G-20 Summit : G-20 शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते दिल्लीत दाखल; बायडेन, सुनक यांचेही आगमन, पाहा व्हिडोओ

  • Written By: Last Updated:

G-20 Summiti : G20 परिषदेच्या अनुषंगाने जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल होत आहेत. दोन दिवसीय शिखर परिषद उद्यापासून दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होणार आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही (Joe Biden) भारतात आले आहेत. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसह ते दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनरल व्ही.के. सिंग हे बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्थ आयटीसी मौर्य शेरेटन हॉलेलमध्ये करण्यात आली आहे. अमेरिकन प्रतिनिधींसाठी 500 खोल्या बुक करण्यात आल्याची माहिती आहे. बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार आहे.

बायडेन हे रविवारी संध्याकाळपर्यंत भारतात राहणार आहेत. G20 शिखर परिषद दोन दिवस चालणार आहे. या परिषदेनंतर बायडेन रविवारी अमेरिकेला परतणार आहेत. विशेष म्हणजे जो बायडेन हे दिल्लीला येण्यााधीच आज संध्याकाळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही भारतात पोहोचले आहेत.

जो बायडेन पहिल्यांदाच भारतात आले आहेत. बायडेनच्या येण्याबाबत साशंकता होती. याशिवाय त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडेन भारतात येणार का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले.

जगभरातील नेते दिल्लीत दाखल
G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे दिल्लीत दाखल झाले आहेत. याशिवाय, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-यो, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, दक्षिण कोरियाचे पंतप्रधान डॉ. सिरिल रामाफोसा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ हे मान्यवर नेतेही दिल्लीत आलेत

Tags

follow us