Download App

“पुरुषांचं आकर्षण, महिलांचं नाही!” युवकाचा प्रश्न अन् प्रेमानंद महाराजांचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल

जर एखादा पुरुष दुसऱ्या एखाद्या पुरुषाप्रती आकर्षित होत असेल तर यात लपवण्यासारखं काहीच नाही. अशा लोकांनी त्यांच्य मनातील विचार पालकांना सांगितलेच पाहिजेत.

Premanand Maharaj : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील प्रसिद्ध अध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांनी (Premanand Maharaj) समलैंगिक संबंधांवर एक अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक संदेश दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रेमानंद महाराजांचे शब्दच असे आहेत जे समाजाला विचार करण्यास भाग पाडतात. मुलांच्या पालकांनी अशा विषयांत समजूतदारपणा आणि हृदयात करुणा ठेऊन निर्णय घ्यावा असा संदेश महाराजांनी दिला आहे. या व्हिडिओत एक युवक प्रेमानंद महाराजांना विचारतो की माझं मन महिलांऐवजी पुरुषांकडे आकर्षित होतं. माझे आईवडील माझं लग्न लावून देण्याचा विचार करत आहेत. मी काय करू?

या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज कठोर स्वरात सांगतात की एखाद्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त करताना तुला लाज वाटत नाही आणि मनात नेमकं काय चाललंय हे आपल्या पालकांना सांगायला लाज वाटते का.. जर एखादा पुरुष दुसऱ्या एखाद्या पुरुषाप्रती आकर्षित होत असेल तर यात लपवण्यासारखं काहीच नाही. अशा लोकांनी त्यांच्य मनातील विचार पालकांना सांगितलेच पाहिजेत. पालकांनीही मुलाची ही मनस्थिती समजून घेतली पाहिजे आणि त्याला साथ दिली पाहिजे.

मुलांच्या काय गरजा आहेत हे समजून घेण्याची जबाबदारी आईवडिलांचीच आहे. या गोष्टी विचारात घेऊन त्यांच्या जीवनाशी संबंधित निर्णय घेतले पाहिजेत. बळजबरी करून आपले निर्णय त्यांच्यावर थोपवण्याऐवजी त्यांना पाठबळ देत वाटचाल करणे नेहमीच लाभप्रद ठरेल.

उत्तर प्रदेशात पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीची जमीन; शत्रूच्या संपत्तीची होणार विक्री..

समाजालाही दिला संदेश

समलैंगिक जे लोक आहेत त्यांनी दुसऱ्या एखाद्या मुलगा किंवा मुलीचे आयुष्य खराब करू नये. समाजाचा दबाव किंवा आईवडिलांच्या आग्रहाखातर विवाहासारखा निर्णय घेणं दुसऱ्याच्या जीवनात दुःख आणील याचा विचार करा असे प्रेमानंद महाराज समाजाला उद्देशून म्हणताना या व्हिडिओत दिसतात. यानंतर प्रेमानंद महाराज एका दुसऱ्या युवकाचं उदाहरण देत सांगतात की जर देवानं तुम्हाला असंच (समलैंगिक) बनवलं असेल तर ही गोष्ट आपल्या मातापित्यांना सांगा. विवाह करून एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका.

समलैंगिक सारख्या संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनेनं उपदेश दिल्यानंतर प्रेमानंद महाराज यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अध्यात्मिक गुरुंचे विचार समलैंगिक संबंध असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत समाजात संवेदनशीलता आणि स्वीकार्यता वाढवण्यास नक्कीच मदत करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देवानं आपल्याला ज्या वृत्ती दिल्या आहेत त्या कुणाला सांगताना त्यात चुकीचं काही नाही. यामुळे तुम्हाला धक्का लागण्याचं काही कारणही नाही. प्रेमानंद महाराज यांचा हा व्हिडिओ भजनमार्गच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवरून जारी करण्यात आला आहे.

मोठी बातमी : उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा आणखी एक अपघात; मालगाडी पटरीवरून घसरली

follow us