Uttarakhand China Pneumonia Case: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये (China) आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. न्यूमोनियासदृश्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले. भारत सरकारनेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क या आजाराबाबत सतर्क केलं. मात्र, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी (Influenza) लक्षणे आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Sunil Tatkare : अजितदादा भेकड असते तर…?; शरद पवार गटाची टीका तटकरेंच्या जिव्हारी
चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण पुढे येत आहेत. कोरोनानंतर आता देशातील जवळपास सर्वच राज्ये चीनमधून उद्भवलेल्या या आजाराबाबत सतर्क आहेत. चीनमध्ये पसरणाऱ्या मायक्रो प्लाझ्मा, न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूबाबत आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. आता अलर्टनंतर बागेश्वर जिल्ह्यातील दोन मुलांमध्ये फ्लू सदृश लक्षणे आढळून आली आहेत. या दोन्ही मुलांचे नमुने तपासणीसाठी सुशीला तिवारी हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय
हल्दवणी येथे नमुने तपासणीसाठी पाठवले
एसीएमओ डॉ.देवेश चौहान यांनी सांगितले की, बुधवारी दोन बालकांना बागेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इन्फ्लूएंझा सारख्या लक्षणांसह त्यांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांचे नमुने सुशीला तिवारी मेडिकल कॉलेज, हल्दवणी येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासाचा अहवाल चार ते पाच दिवसांत येईल. त्यानंतरच हा विषाणू तोच आहे की, नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत सध्या आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येत आहे. इन्फ्लूएंझाचा सामना करण्यासाठीही तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
रुग्णालयांना देण्यात आले ‘हे’ आदेश
या विषाणूजन्य आजारात पाचव्या टप्प्यात ऑक्सिजनची आवश्यकता असते. याबाबत राज्यभरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनची पूर्ण मात्रा ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळंजिल्हा रुग्णालयातील सर्व 68 खाटा ऑक्सिजन पाइपलाइनला जोडण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात 650 एलपीएमचे दोन ऑक्सिजन निर्मिती संयंत्र बसविण्यात आले आहेत. कांडा आणि कपकोट सीएचसीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे संयंत्रही बसवण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, व्हेंटिलेटर आणि इतर वस्तू तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
सरकार सतर्क
उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकीारी आणि सीएमओना अलर्ट मोडवर ठेवले. आरोग्य सचिव राजेश कुमार यांनी आदेश जारी करतांना सर्वांना या आजाराबाबत पूर्णपणे सतर्क राहावे, रुग्णालयांमध्ये पूर्ण व्यवस्था करावी आणि कोणत्याही गोष्टीबाबत निष्काळजीपणा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.