इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला, आतापर्यंत 9 मृत्यू; महाराष्ट्राचे सर्वाधिक 58 रुग्ण

इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला, आतापर्यंत 9 मृत्यू; महाराष्ट्राचे सर्वाधिक 58 रुग्ण

भारतात कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर सर्वकाळी सुरळीत सुरू असतांना आता H3N2 या नव्या विषाणूने देशातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये H3N2 या विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत स्वाइन फ्लू आणि H3N2 चे एकूण 352 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 58 रुग्ण हे H3N2 या आजाराने ग्रस्त आहेत.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुरा, एवट्या मुंबईत 32 रुग्ण आढळून आहेत, त्यापैकी 4 रुग्ण हे H3N2 आणि 28 रुग्ण हे H1N1चे आहेत. या सर्व H3N2 रुग्णांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. राज्यात इन्फ्लूएंझा H3N2 चा वाढता प्रभाव लक्षात घेता आज राज्याचे सीएम एकनाथ शिंदे हे तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

महत्वाच्या बाबी
1. गुजरातमधील वडोदरा येथे H3N2 या विषाणूमुळे एका 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा नाही.
2. दिल्लीच्या LNJP हॉस्पिटलमध्ये 20 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
3. खबरदारीचा उपाय म्हणून पुद्दुचेरीतील सर्व शाळा १६ ते २६ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
4. दरम्यान, बुधवार आसाम राज्यात H3N2 या विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे.

महाराष्ट्रात विषाणूमुळे दोघांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात H3N2 या विषाणूमुळे आतापर्यंत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी हा मागील आठवड्यात मित्रांसोबत फिरायला अलिबागला गेला होता. अलिबागहून परत आल्यांतर त्याची प्रकृती ढासळू लागली होती. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, H3N2 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. H3N2 हा विषाणू जीवघेणा नसून तो उपचाराने निश्तित ठीक होऊ शकतो, त्यामुळे नागरिकरांना घाबरून जाण्याची गरज नाही, असं सावंत यांनी सांगितले आहे.

79% इन्फ्लूएंझा नमुन्यांमध्ये H3N2 विषाणू आढळले
केंदीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या एकूण इन्फ्लूएंझा नमुन्यांपैकी सुमारे 79 टक्केमध्ये H3N2 विषाणू आढळले आहेत. तर इन्फलूअन्झा बी व्हिक्टोरिया विषाणू 14 नमुन्यांमध्ये आढळले आहेत आणि इन्फ्लूएंझा ए H1N1 विषाणू 7 टक्केमध्ये आढळले आहेत. H1N1 ला सामान्य भाषेत स्वाइन फ्लू असेही म्हणतात. मंत्रालयाने सांगितलं की, मार्च महिन्याच्या अखेरी पर्यंत H3N2 या विषाणूची प्रकरणे कमी होऊ लागतील.

दरम्यान, स्वाईन फ्लू H1N1, इन्फ्लूएंझा H3N2 किंवा कोरोना हे तिन्ही संसर्गजन्य आजार असून विषाणूंद्वारे या रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे मास्क वापरणं यापासून वाचण्यासाठी उत्तम आहे. म्हणून नागरिकांना मास्क घालूनच घराबाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube