Uttarakhand : Tempo traveller with 17 passengers falls in gorge on Rishikesh-Badrinath highway, 8 killed : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातून एका मोठ्या अपघाताची बातमी आली आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून अंदाजे 8 ते 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त वाहनामध्ये 23 प्रवासी होते.
VIDEO | Uttarakhand: Around eight people lost their lives after a tempo, they were travelling in, fell into a gorge on Rishikesh-Badrinath national highway. More details are awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/DrcaPhTfBX
— Press Trust of India (@PTI_News) June 15, 2024
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ हा भीषण अपघात घडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथक घटनास्थळी रवाना झाले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
जनपद रुद्रप्रयाग में टेम्पो ट्रैवलर के दुर्घटनाग्रस्त होने का अत्यंत पीड़ादायक समाचार प्राप्त हुआ। स्थानीय प्रशासन व SDRF की टीमें राहत एवं बचाव कार्यों में जुटी हुई है। घायलों को नज़दीकी चिकित्सा केंद्र पर उपचार हेतु भेज दिया गया है। ज़िलाधिकारी को घटना की जाँच के आदेश दे दिए…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 15, 2024
मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
या घडलेल्या भीषण अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घटलेली घटना अतिशय दुःखद असून, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना धामी यांनी केली आहे. तसेच स्थानिक प्रशासक आणि एसडीआरएपची टीम मदतीसाठी रवाना झाली असून, जखमींना जवळील रूग्णालयांमध्ये दाखल करण्यत आले असून, हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.