Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मजुरांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. त्यात आता वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो अशी भीती अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी व्यक्त केली. सध्या सर्व मजूर सुरक्षित असून 25 डिसेंबरपर्यंत ते घरी जातील अशी शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते यासाठी आणखी सहा ते सात दिवस लागू शकतात.
Uttarkashi Tunnel: 41 मजुरांना बोगद्यातून शोधणारी ग्राउंड पेनेट्रेटिंग सिस्टिम काय आहे?
उत्तराकाशी जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिलक्यारा बोगद्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या चार धाम ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. 12 नोव्हेंबर रोजी या बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे येथे काम करणारे मजूर अडकून पडले. मागील 14 दिवसांपासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण, अद्याप यश मिळालेले नाही.
विघ्न वाढलं, ‘ऑगर’ मशीन बिघडली
बचावकार्य जोरात सुरू असताना अडचणीही येत आहेत. आताही एक मोठी अडचण आली आहे. ड्रिलिंग सुरू असताना ऑगर मशीनचा काही भाग अडकल्याने मशीन पूर्णपणे बिघडले होते. त्यानंतर आता दुसऱ्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे. आता वरच्या भागातून आडवे ड्रिलिंग केले जाणार असल्याचे समजते जे जास्त धोकादायक आहे. दुसरीकडे हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या बचावकार्यात आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.
Operation Silkyara : बोगद्यात अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका? 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण..
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलता यावे यासाठी बीएसएनएलने येथे खास लँडलाइन फोनची व्यवस्था केली आहे. ज्याच्या मदतीने कामगार त्यांच्या परिवाराशी संपर्क साधू शकतात. बोगद्याच्या आत बचावकार्यात असलेल्या लोकांसाठी एक सुरक्षा छत्रीही तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले. आता हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने टेन्शन वाढले आहे. जर याठिकाणी पाऊस सुरू झाला तर अडचणी अनेक पटींनी वाढू शकतात.