Operation Silkyara : बोगद्यात अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका? 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण…

Operation Silkyara : बोगद्यात अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका? 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण…

Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 11 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 11 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही.

राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक : ‘इंडिया’ आघाडी प्रवेशासाठी आंबेडकरांची साखर पेरणी

पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच असून मजूरांना बाहेर काढण्यासाठी देशभरातून यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी उत्तरकाशीमध्ये दिवसरात्र ड्रिलिंगचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण झालं आहे. बोगद्यात अडकलेले 41 मजूर बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्का जाम होणार! ‘पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या’ : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम

बोगद्यात ड्रिल करण्यात आलेल्या या पाईपद्वारे अडकलेल्या मजुरांना खाद्यपदार्थ, फळे, अंडी, खिचडी पाठवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी एनएचआयडीसीएलच्या पथकाने सहा इंची पाईप खोदण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास समोरून दगड आल्याने ते थांबले, मात्र दुपारी 4 च्या सुमारास हा ५७ मीटरचा पाईप पुढे ढकलण्यात पथकाला यश आले. आता 4 इंची पाईपसोबत 6 इंची पाईपद्वारे मदत साहित्य देखील कामगारांना पाठवले जाणार आहे.

सर्व मजूर बोगद्यात सुरक्षित असून मजुरांना जुन्या पाईपद्वारे त्यांना फक्त हरभरा, मीठ, औषधे, चॉकलेट इत्यादी पाठवणे शक्य होते, परंतु नवीन पाईपद्वारे ते फळे, अंडी यांसह आणखी खाद्यपदार्थ पाठवत आहेत कामगारांची स्थिती पाहण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असून बोगद्यात मोठ्या प्रमाणत धूळ असल्याने चित्र स्पष्टपणे दिसत नसल्याचे एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितलं आहे.

फलंदाजांना मिळणार फुकटात 5 धावा, आयसीसीने जाहीर केला ‘स्टॉप क्लॉक’ नियम

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी जवळच्या हनुमान मंदिरात प्रार्थना केली. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून स्कॅब बोगदा बांधण्यात जवळपास यशाकडे वाटचाल केल्याने व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गुरुवारी सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.

192 तास उलटले तरीही मजुरांची अद्यापही सुटका होत नसल्याने नातेवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे. जसेजसे जास्त दिवस उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत असून आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांकडून मागणी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube