Download App

Uttarkashi Helicopter Crash: उत्तराखंडमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

Helicopter Crash: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानीजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

Uttarkashi Helicopter Crash: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानीजवळ गुरूवारी (8 मे) हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash) आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे

बातमी अपडेट होत आहे.

गुरुवारी गंगनानी येथील भागीरथी नदीजवळ हा अपघात झाला. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी आणि कॅप्टन होता. प्रवाशांमध्ये ४ पुरुष आणि २ महिला होत्या. हेलिकॉप्टरमधील हे प्रवासी मुंबई आणि आंध्र प्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात होते. अपघातस्थळावरून प्राप्त झालेल्या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरच्या आतील भागाचे बरच नुकसान झाल्याचे दिसून आले.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाक बिथरला, India Vs Pak युद्ध झाल्यास कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका? 

दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. पोलीस, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, टीम १०८ रुग्णवाहिका वाहनं घटनास्थळी दाखल झाली असून पथकाने सध्या बचावकार्य सुरू केले आहे.

मुख्यमंत्री धामींनी दिले सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथके मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. ते म्हणाले, मी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. चारधाम यात्रेसाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक उत्तराखंडमध्ये येत आहेत.

उत्तराखंडमध्ये खराब हवामान…
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी वादळाचा इशारा जारी केला आहे. चारधाम यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट झाली आहे. हवामान खात्याने आज उत्तराखंडसाठी हवामानाचा इशाराही जारी केला आहे.

follow us