राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले; प्रवासाला निघालेल्या हेलिकॉप्टरचा बिघाड

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले; प्रवासाला निघालेल्या हेलिकॉप्टरचा बिघाड

Governor Haribhau Bagade Helicopter Accident : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ते हेलिकॉप्टर अपघातमधून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली आहे. (Bagade ) शिवाय, या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत.

राज्यपाल बागडे ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवासाला निघाले होते, त्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच त्यातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच हेलिकॉप्टर तत्काळ खाली उतरवले गेले आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आढळून आल्याचे बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल बागडे पालीच्या दौऱ्यावर होते आणि ते पाली येथून जयपूरकडे रवाना होत होते. ज्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, तेवढ्यात हेलिकॉप्टरमधून धूर निघू लागला. पायलटच्या ही बाब तत्काळ लक्षात आली आणि त्याने दुसऱ्याच मिनिटाला हेलिकॉप्टर खाली उतरवलं.

आज गुढीपाडवा! राज्यभरात हिंदू नवीन नववर्षाचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन

राज्यपाल बागडे यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर का निघू लागला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अशावेळी असं म्हटलं जात आहे की राज्यपाल बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाऊ शकतो. मात्र या घटनेमुळे राज्यपालांच्या सुरक्षेवर आणि हेलिकॉप्टरच्या स्थितीवरही प्रश्न निर्माण केले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल हरिभाऊ बागडे सुरक्षित आहेत आणि या घटनेदरम्यान त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. राज्यपालांचे सुरक्षा पथक आणि आपत्कालीन प्रतिक्रिया दलाने घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली आली आणि राज्यपाल बागडे यांची सुरक्षा सुनिश्चित केली.

हेलिकॉप्टरमधून धूर निघण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे आणि या घटनेची चौकशी केली जात आहे. या दरम्यान हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी केली जाणार असून, सर्व सुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं आहे की नाही हेही पाहिलं जाणार आहेत. या घटनेसाठी कोणताही बेजबाबदारपणा तर कारणीभूत नाही ना, हेही पाहिलं जाईल. तसंच, अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी अधिकारी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या