तेलंगाणात आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर लागू करण्याचा निर्णय, वंचितने कॉंग्रेसला घेरलं

Vanchit Bahujan Yuva Aghadi Rajendra Patode Criticized Telangana Congress : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच तेलंगणात (Telangana Congress) मोठी घडामोड घडली. आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर (SC-ST Creamy Layer) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसे बाबरी मशीद पडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची निवड संघ, भाजप आणि शिवसेनेने केली […]

Congress

Congress

Vanchit Bahujan Yuva Aghadi Rajendra Patode Criticized Telangana Congress : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच तेलंगणात (Telangana Congress) मोठी घडामोड घडली. आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर (SC-ST Creamy Layer) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसे बाबरी मशीद पडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची निवड संघ, भाजप आणि शिवसेनेने केली होती. तेच कृत्य तेलंगणा काँग्रेस सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी केलं असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे (Vanchit Bahujan Yuva Aghadi) प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी (Rajendra Patode) केलाय.

‘दादा डोईजड, भाईंचे पंख छाटण्यासाठी…’ फडणवीसांनी स्वत:चा खास अधिकारी नेमला; रोहिणी खडसेंनी सरकारला डिवचले

एकीकडे निळे कपडे घालून आंदोलन करायचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) लोकशाही अन् आरक्षणाच्या संदर्भात मोठमोठी भाषणं ठोकणाऱ्या कॉंग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. तेलंगणात देशातील वर्गीकरणाच्या संबंधातील पहिला निर्णय घेण्यात आलाय. ऐन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी हा निर्णय तेलंगणाच्या कॉंग्रेस सरकारने घेतलेला आहे.

डॉ. बाबासाहेबांचा विरोध करणाऱ्या भाजप, शिवसेना आणि संघाने 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली होती. त्याचप्रमाणे 14 एप्रिल रोजी कॉंग्रेसने तेलंगणात आरक्षण संपवण्याचं काम केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी समाजातील मागासलेल्या घटकांसाठी अधिकार बहाल केले होते, ते काढून घेण्याचं काम केलेलं आहे. त्यावर अन्यायकारक व्यवस्था सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, याचं प्रदर्शिन त्यांनी आरक्षित घटकांसमोर केलेलं आहे.

नादच नाय करायचा! ‘पोराचा बाजार उठला रं… ‘ झापुक झुपूकचं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचं काम कॉंग्रेस करत आहे. त्यांच्याकडे वकिलांची टीम आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत. मात्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिलं नाही, उलट तेलंगाणा असा निर्णय लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. काळाकुट्ट इतिहास निर्माण करण्याचा काम केलंय. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही कॉंग्रेसला श्रद्धांजली वाहतो.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खर्गे अनुसुचित जातीचे आहेत. त्यांचं सरकार जर असा निर्णय घेत असेल तर आपल्या पूर्वजांना जे आरक्षणविरोधी पूर्वज कॉंग्रेसचे होते, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशात समानता लागू करावी लागली होती, त्यांच्या पापाचं निर्दारण करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा. जर ते खरंच अनुसुचित जमातीच्या हिताचा विचार करत असते, तर त्यांनी असा निर्णय घेतला नसता. त्यामुळे मी राष्ट्रीय कॉंग्रेस अन् तेलंगाणा कॉंग्रेसला श्रद्धांजली अर्पण करतो, असं वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी म्हटलंय.

Exit mobile version