Vande Bharat Train : पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज रविवारी पीएम मोदी यांनी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सना (Vande Bharat Train) ग्रीन सिग्नल दिला. या नव्या रेल्वेंमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. देशातील 11 राज्यांत या नऊ ट्रेन धावणार आहेत. या निर्णयामुळे देशातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यास आणखी मदत होणार आहे.
PHOTO | PM Modi speaks as he flags off nine Vande Bharat Express trains via video conferencing. pic.twitter.com/EI0DAxafOo
— Press Trust of India (@PTI_News) September 24, 2023
देशातील ज्या 11 राज्यांत या ट्रेन धावणार आहेत यामध्ये राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेन्सच्या माध्यमातून या राज्यांतील रेल्वे कनेक्टिव्हीटी आणखी सुधारेल. या ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांन संबोधित केले. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
या ट्रेन अधिक वेगवान (Indian Railway) आहेत. यामुळे प्रवासातील वेळ कमी होणार आहे. राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासरगोड-तिरुअनंतपूरम वंदे भारत एक्सप्रेस प्रवासात प्रवाशांचा तीन तासांचा वेळ वाचणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे आहे. 160 किलोमीटर प्रति तास वेग पकडण्याच्या उद्देशाने या ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारीत सूचना प्रणाली, ऑनबोर्ड वाय-फाय आणि सीसीटीव्ही कॅमेरा अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
अहमदनगर : मतदारसंघ राष्ट्रवादीकडे अन् शक्तिप्रदर्शन भाजपचे! बावनकुळेंची पदाधिकाऱ्यांसह खलबत
सध्याच्या सगळ्या वंदे भारत रेल्वेंमध्ये फक्त चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास आहे. या कमी अंतरावर चालवल्या जात असल्याचे सांगण्यात आले. आता ट्रेनची संख्या वाढल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या नंतर आणखीही काही ट्रेन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात आले.