Download App

Rajasthan News : मला मुख्यमंत्री करा; वसुंधरा राजेंचा थेट अमित शाहंना फोन

  • Written By: Last Updated:

Vasundhara Raje Scindia as CM: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मजबूत नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी भाजपकडे वेगळीच मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, (Vasundhara Raje Scindia) यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्यालाच एका वर्षासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्या स्वतः हे पद सोडणार आहेत. या सोबतच पक्षनेतृत्वाने त्यांना सभापती करण्याची ऑफर दिल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, सभापती करण्याचा पक्षाचा प्रस्ताव वसुंधरा राजेंनी नाकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार रोमँटिक अंदाजात 

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबत संभ्रम कायम आहे. वसुंधरा राजे आपल्या समर्थक आमदारांची भेट घेत आहेत. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे मुख्यमंत्री बनवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर वसुंधरा राजे यांना आमदारांना वेगळे न भेटण्याचा सल्ला नड्डा यांनी दिला आहे. रविवारी रात्री वसुंधरा राजे यांनी जेपी नड्डा यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर नड्डा यांनी त्यांना स्पीकर बनवण्याची ऑफरही दिली, जी वसुंधरा यांनी नाकारली.

वसुंधरा राजे यांचे शक्तिप्रदर्शन

राजस्थानमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पुन्हा एकदा आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. रविवारी (दि. 10) सकाळी दिल्लीहून परतल्यानंतर राजे जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. दुपारी भाजपचे अनेक आमदार त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याशिवाय माजी प्रदेशाध्यक्ष अशोक पर्नामी, माजी आमदार प्रल्हाद गुंजाळ, माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत, माजी मंत्री देवीसिंह भाटी यांनीही त्यांची भेट घेतली.

कांदा प्रश्नावरून पवार आक्रमक; म्हणाले, दिल्लीकरांना फक्त रस्त्यावरची भाष कळते 

बहुमताचा आकडा पार केला, तरीही मुख्यमंत्री का ठरला नाही?
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 115 जागा जिंकून बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. मात्र, निवडणूक निकाल लागून आठवडा उलटून गेला तरीही भाजपला मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. वास्तविक, मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर पक्षातील अंतर्गत कलह वाढेल आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी भीती भाजपला वाटत आहे. अशा स्थितीत भाजपने तीन ज्येष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून राजस्थानला पाठवले. भाजपने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार सरोज पांडे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची राजस्थानसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मंगळवारी भाजप आमदारांची बैठक
भाजप नेतृत्वाने नियुक्त केलेल्या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत उद्या, मंगळवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या बैठकीतच राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. खरे तर पक्षनेतृत्वाने निरीक्षकांना मुख्यमंत्रिपदावरून आमदारांशी बोलून अहवाल देण्यास सांगितले होते. या अहवालावर निर्णय घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहे

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us