Download App

वेदांता-फॉक्सकॉनला ग्रहण; मोदी-अग्रवाल संबंधात मिठाचा खडा, गुजरातमध्ये मोठा धक्का मिळणार?

  • Written By: Last Updated:

Vedanta Foxcon Project Funds :  महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र, हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारताचे मायनिंग किंग म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा भारतातील सेमीकंडक्टरचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ब्लूमबर्गने वृत्त प्रकाशित केले आहे.

हातकणंगलेत राजू शेट्टींची कोंडी; राष्ट्रवादीतून स्वतः जयंत पाटीलच उतरणार लोकसभेच्या मैदानात?

वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे ​​मालक अनिल अग्रवाल यांच्या सेमीकंडक्टर प्लांटला भारत सरकारकडून निधी देण्यास नकार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी गेल्या वर्षी भारतात 19 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केली होती, परंतु आता सरकारच्या भूमिकेमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.

“PM मोदी देवालाही शिकवतील की…”; अमेरिकेतून राहुल गांधींनी डागली तोफ

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत सरकार अनिल अग्रवाल यांच्या वेदांत आणि तैवानी आयफोन निर्माता होन हाय यांच्या 28-नॅनोमीटर सेमीकंडक्टर बनवण्याच्या प्रोजेक्टला निधी देण्यास नकार देण्याच्या विचारात आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये भारत सरकारने देशाला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी कंपन्यांना आमंत्रित केले होते. सरकारने यासाठी 10 अब्ज डॉलरचा निधीही जाहीर केला होता. यासाठी वेदांत आणि होन हाय यांच्या संयुक्त उपक्रमाने अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही कंपन्यांनी निश्चित निकषांची पूर्तता केलेली नसल्याचे तपासात आढळून आले, त्यामुळे संबंधित कंपन्यांना 10 अब्ज डॉलरचा निधी देण्यास भारत सरकार नकार देत अग्रवाल यांच्या कंपनीला मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी-अग्रवाल संबंधात मिठाचा खडा?

वेदांता प्रोजेक्ट महाराष्ट्रातून जाण्यामागे भाजप आणि मोदी असल्याची चर्चा होती. हा पोजेक्ट गुजरातला सुरू व्हावा यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनीही प्रयत्न केल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्वरेने सूत्र हालवत संबंधित कंपनीला गुजरातमध्ये मोक्याच्या ठिकाणी जागादेखील उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या निधीसाठी कंपनीकडून आवश्यक निकषांची पूर्तता करण्यात न आल्याने हा निधी देण्यास केंद्राकजून नकार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोदी आणि अनिल अग्रवाल यांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा पडून हे संबंध बिघडण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.

 

Tags

follow us