Auto Sales in March 2025 : भारतीय बाजारात दर महिन्याला लाखो वाहनांची विक्री होते. प्रत्येक महिन्याच्या विक्री संदर्भात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून एक अहवाल जारी केला जातो. देशभरात महिन्याभरात किती वाहनांची विक्री (Auto Sales in March 2025) झाली याची माहिती या अहवालात दिली जाते. मागील मार्च महिन्याचा अहवाल हाती आला आहे. या महिन्यात कोणत्या वाहनांची किती विक्री झाली याची माहिती घेऊ या..
देशभरात मार्च 2025 या महिन्यात एकूण 21 लाख 26 हजार 988 वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, खासगी, कमर्शिअल वाहनांसह ट्रॅक्टरचाही समावेश आहे. रिपोर्टनुसार सर्वाधिक दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. यानंतर खासगी वाहनांची विक्री झाली आहे. यानंतर तीनचाकी वाहनांचा नंबर आहे. तर व्यावसायिक वाहनांची विक्री चौथ्या क्रमांकावर राहिली आहे.
सोयाबीन विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, राणाजगजितसिंह पाटलांचं आवाहन
भारत वाहनांचा मोठा बाजार आहे. येथे वाहनांची मागणी सातत्याने वाढत राहते. दुचाकी वाहनांना जास्त मागणी आहे. या रिपोर्टनुसार मार्च महिन्यात एकूण 15 लाख 8 हजार 232 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. वैयक्ति वापरासाठी लोकांनी 2 लाख 50 हजार 603 वाहनांची खरेदी केली आहे. तीनचाकी वाहनांचा विचार केला तर मार्च महिन्यात देशभरात एकूण 99 हजार 376 तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे. कमर्शियल वाहनांच्या बाबतीत पाहिलं तर मार्च महिन्यात एकूण 94 हजार 764 वाहनांची विक्री झाली आहे. ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये महिनाभरात एकूण 74 हजार 13 ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे. कृषी विषयक आणि माल वाहतुकीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो.
फाडाच्या रिपोर्टनुसार मंथ ऑन मंथ बेसिसवर वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. माहितीनुसार मार्च महिन्यात एकूण 21 लाख 26 हजार 988 युनिट्स वाहने विक्री झाली. फेब्रुवारी महिन्यातील विक्रीचे आकडे पाहिले तर या महिन्यात देशभरात एकूण 18 लाख 99 हजार 196 वाहनांची विक्री झाली होती. या दोन महिन्यांतील विक्रीचा आढावा घेतला तर मंथ ऑन मंथ बेसिसमध्ये 11.99 टक्क्यांची वाढ दिसूनय येत आहे.
मुंबई-दिल्लीलाही पछाडले! ‘या’ शहरात इलेक्ट्र्रिक कार सुसाट; एकाच वर्षात रेकॉर्डब्रेक विक्री
मंथली बेसिसवर वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वार्षिक बेसिसवर मात्र वाहन विक्रीत 0.68 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. मार्च महिन्यात एकूण वाहन विक्री 21 लाख 26 हजार 988 इतकी आहे. मागील मार्च 2024 मधील वाहन विक्री लक्षात घेतली तर या महिन्यात एकूण 21 लाख 41 हजार 483 वाहनांची विक्री झाली होती.