Mukesh Ambani : गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat Global Summit) समिटमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक विधान केले आहे. आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातेत आज मी आलो आहे. मला गर्व आहे की मी एक गुजराती आहे. ज्यावेळी विदेशी लोक नव्या भारताचा विचार करतात त्यावेळी ते गुजरातचाच विचार करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे हे शक्य झाले. रिलायन्स (Reliance Industries) ही एक गुजराती कंपनी होती आहे आणि सदैव राहणार असे अंबानी म्हणाले.
अंबानी पुढे म्हणाले, भारतात जवळपास 12 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक मागील 10 वर्षांच्या काळात केली आहे. यामध्ये एक तृतीयांशापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्येच केली आहे. आता जगातील कोणतीही ताकद भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून रोखू शकत नाही. तर दुसरीकडे आगामी काळात एकट्या गुजरातची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलर इतकी होईल असे अंबानी यांनी सांगितले.
अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींची झेप, गौतम अदानी आणखी घसरले
देशातील तरुणांसाठी अर्थव्यवस्थेत नवीन शोध घेण्याची आणि कोट्यावधी लोकांना कमाईची संधी उपलब्ध करून देण्याची हीच योग्य वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचा भक्कम पाया घातला आहे. 2047 पर्यंत भारताला 35 ट्रिलयमन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून आता जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. एकट्या गुजरातचीच अर्थव्यवस्था लवकरच तीन ट्रिलियन डॉलरची होईल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला.
सुझुकी मोटर्सची 35000 कोटींची गुंतवणूक
मारुती सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन गुजरातमधून लाँच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुझुकी मोटर गुजरातमध्ये 3200 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या प्लांटसाठी 35000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे तोशिहिरो सुझुकी यांनी सांगितले. या घोषणेमुळे सुझुकीने गुजरातमध्ये 38200 कोटींची मोठी गुंतवणूक योजना सादर केली आहे.
मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी
अदानी समुहाशिवाय गुजरातमध्ये टाटा आणि सुझुकी समुहानेदेखील मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. गुजरात आणि टाटा यांच्यातील संबंध अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. टाटा 1939 पासून गुजरातमध्ये कार्यरत आहेत. गुजरातमध्ये टाटाच्या 21 कंपन्या असून, येथे 50000 हून अधिक टाटा कर्मचारी काम करत आहेत. टाटा बडोदा ते धौलेडापर्यंत C295 संरक्षण विमान विकसित करणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये येत्या दोन महिन्यांत 20-GW बॅटरी स्टोरेज कारखाना सुरू होणार असल्याचे टाटासन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.