मुकेश अंबानींची मोठी डील; मनोरंजन क्षेत्रात आता Reliance सर्वात मोठी कंपनी

मुकेश अंबानींची मोठी डील; मनोरंजन क्षेत्रात आता Reliance सर्वात मोठी कंपनी

Jio and Disney Hotstar : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं पाऊल ठेवलं आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Jio) मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज वॉल्ट डिस्नेसोबत (Disney Hotstar) करार केला आहे. याअंतर्गत आता वॉल्ट डिस्नेच्या व्यवसायात रिलायन्सची 51 टक्के तर वॉल्ट डिस्नेची 49 टक्के मालकी असणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलीनकरणानंतर देशातील सर्वात मोठी मनोरंजन समोर येणार आहे.

Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! चौहान-सिंधियांचे खास नेते मंत्रिमंडळातून बाहेर…

मागील आठवड्यात लंडनमध्ये रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेसोबत हा करार करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही कंपन्यांना मनोरंजन विश्वात सर्वात मोठा मीडियासह मनोरंजन व्यवसाय करण्याचा करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण स्टॉक आणि कॅशमध्ये असणार आहे. हा करार फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचं समोर येत असून रिलायन्सला जानेवारीअखेर ते पूर्ण करायचे आहे.

लंडनमध्ये झालेल्या बैठकीत केविन मेयर आणि मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय मनोज मोदी उपस्थित होते. मेयरने डिस्नेमध्ये काम केले आणि जुलैमध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इग्नर यांनी त्यांना सल्लागार म्हणून परत आणले. हा करार झाल्यानंतर उर्वरित प्रक्रियेवर काम सुरू होणार आहे. यामध्ये मूल्यांकनाचाही समावेश आहे. 12 डिसेंबर रोजी या कराराबाबत पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे. विलीनीकरण करारामध्ये स्टार इंडिया आणि वायकॉम18 च्या संपूर्ण ऑपरेशन्सचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?

दरम्यान, भारतात स्टार इंडियाचे भारतात 77 चॅनेल्स असून वायाकॉम 18 चे 38 चॅनल सक्रिय आहेत. एकूण दोन्ही मिळून 115 चॅनेल सक्रिय आहेत. यामध्ये Disney Plus Hotstar आणि Jio Cinema या दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. यंदाच्या वर्षात डिस्ने स्टारचा नफा 1,272 कोटी रुपये होता तर डिस्ने प्लस हॉटस्टारला 748 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. Viacom 18 चा नफा 11 कोटी रुपये होता. या करारामध्ये 45 ते 60 दिवसांचा विशेष कालावधी असू शकतो जो परस्पर संमतीने वाढविला जाऊ शकतो. या करारासाठी दोन कंपन्यांमध्ये अनेक महिन्यांपासून बोलणी सुरू होती. डिस्ने इंडियाच्या प्रवक्त्याने या करारावर बोलण्यास नकार दिला आहे.

रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या या करारामुळे आता दोन्ही कंपन्या एकत्र होणार आहेत. त्यामुळे आता इतर कंपन्या सोनी टिव्ही, नेटफ्लिक्स अॅमेझॉन प्राईमला मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या RIL चे Jio मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक अॅप्स आणि Viacom18 सह उपस्थित आहे. या विलीनीकरणात जिओ सिनेमाचाही समावेश करण्यात आला असून या क्षेत्रात अंबानींना केवळ डिस्नेकडूनच स्पर्धा होत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube