मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी

मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देत 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याच्या प्रकरणात एका 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे. गणेश रमेश वनपारधी असे संशयित आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणामधील आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आज (4 नोव्हेंबर) पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (A 19-year-old man was arrested in industrialist Mukesh Ambani received a death threat)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश अंबानी यांना 31 ऑक्टोबर रोजी एका आठवड्यात तिसऱ्यांदा धमकी देण्यात आली होती. यात त्यांच्याकडून 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या आधी ज्या दोन धमक्या मिळाल्या होत्या त्यात पहिल्यांदा 20 कोटी आणि नंतर 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागील ई मेलला प्रतिसाद दिला नाही म्हणून रक्कम 200 कोटी आणि त्यानंतर पुन्हा 400 कोटी करण्यात आल्याचे आरोपीने म्हटले आहे.

Elvish Yadav : ‘हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे’; फडणवीसांचा हल्लाबोल

एका आठवड्यात आलेल्या तीन धमक्यांनंतर उद्योग विश्वात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली होती. ईमेलच्या आयपी अॅड्रेसवरुन पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरु केला होता. त्यानंतर तपास करत पोलीस तेलंगणातील हैदराबादपर्यंत जाऊन पोहचले. यात आज (4 नोव्हेंबर) पहाटे गणेश रमेश वनपारधी या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

दरम्यान, पोलीस माझा शोध घेऊ शकत नाहीत. ते मला अटक करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जीवे मारण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. मग तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही. आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो असे धमकीच्या ई मेलमध्ये म्हटले होते. मात्र आता या संशयिताला अटक करत पोलिसांनी त्याच्या दाव्यातील हवाच काढली आहे.

अंबानींना यापूर्वीही धमकी :

अंबानी यांना धमकीची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती. तर त्याआधी त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. अंबानींच्या सुरक्षिततेचा विचार करता त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. याआधी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन उडवून देण्याची तसेच अंबानींच्या कुटुंबियांसंदर्भात धमकी दिली होती.

Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर

देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांनी आता गौतम अदानी (Gautam Adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती बनले आहेत. हिंडेनबर्गच्या (Hindenburg)अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube