Mukesh Ambani : धमकी सत्र सुरुच! अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

Mukesh Ambani : धमकी सत्र सुरुच! अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मिळत असलेल्या धमक्या थांबलेल्या नाहीत. आता तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे तब्बल 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या आधी ज्या दोन धमक्या मिळाल्या होत्या त्यात पहिल्यांदा 20 कोटी आणि नंतर 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागील ई मेलला प्रतिसाद दिला नाही म्हणून रक्कम 200 कोटींवरून 400 कोटी करण्यात आल्याचे आरोपीने म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देण्यात आली आहे. या प्रकाराने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.

आधीची धमकी हलक्यात घेतली, आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा… : मुकेश अंबानींना पुन्हा मेल

या धमकी देणाऱ्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल केले आहेत. पोलीस माझा शोध घेऊ शकत नाहीत. ते मला अटक करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जीवे मारण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. मग तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही. आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो असे धमकीच्या ई मेलमध्ये म्हटले आहे.

याआधीही अंबानी यांना दोन वेळेस धमकी देण्यात आली होती. दुसऱ्यांदा जी धमकी मिळाली त्यात दोनशे् कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपास सुरू केला. मात्र,  या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करणे याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीही हमास संघटनेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानशी…; कुमार केतकरांचा मोठा दावा

अंबानी यांना धमकीची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती. तर त्याआधी त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. अंबानींच्या सुरक्षिततेचा विचार करता त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. याआधी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन उडवून देण्याची तसेच अंबानींच्या कुटुंबियांसंदर्भात धमकी दिली होती.

देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांनी आता गौतम अदानी (Gautam Adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती बनले आहेत. हिंडेनबर्गच्या (Hindenburg)अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube