आधीची धमकी हलक्यात घेतली, आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा… : मुकेश अंबानींना पुन्हा मेल

आधीची धमकी हलक्यात घेतली, आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा… : मुकेश अंबानींना पुन्हा मेल

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना 24 तासांत दुसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. यात तब्बल 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. काल रात्री उशीरा याबाबत माहिती देण्यात आली. यापूर्वी शनिवारीही (27 ऑक्टोबर) अंबानी यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी देत 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

दरम्यान, हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा ईमेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठवला याचा शोध घेतला जात आहे. (industrialist, Reliance Group chief Mukesh Ambani has received death threats for the second time in 24 hours.)

Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (27 ऑक्टोबर) अंबानी यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी देत 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. हे पैसे दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शार्प शुटर्स आहेत, अशी धमकी देण्यात आली होती. ही धमकी ज्या ईमेल आयडीवरुन आली होती, त्याच ईमेल आयडीवरुन आता पुन्हा धमकीचा ईमेल आला आहे. मात्र, यावेळी 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. आधीचा ईमेल सिरीयस न घेता त्यावर कोणताही प्रतिसाद न दिल्याने खंडणीची रक्कम 20 कोटी रुपयांवरुन 200 कोटी रुपये झाली आहे, असे यात म्हटले आहे.

Devendra Fadnavis : फडणवीस CM, त्यात चुकीचं काय? शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

यावर्षी फेब्रुवारीमध्येही धमकी मिळाली होती

अंबानी यांना धमकीची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती. तर त्याआधी त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. अंबानींच्या सुरक्षिततेचा विचार करता त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. याआधी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन उडवून देण्याची तसेच अंबानींच्या कुटुंबियांसंदर्भात धमकी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube