Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर

Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर

Sanjay Raut replies Devendra Fadnavis : शिवसेनेनेच मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) गेलं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. जात-पात-धर्म न पाहता आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, फडणवीसांना हे कधीच कळणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं

राऊत म्हणाले, फडणवीस शिवसेनेबाबत भूमिका मांडत असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि महाराष्ट्राला कुणाकडून राजकारण शिकण्याची गरज नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं आपल्याला ज्ञान आहे. तपास यंत्रणा तुमच्याकडं नसतील तर कुणीही तुमचं ऐकणार नाही. आज तुम्ही मांडलेला उच्छाद उद्या तुमच्याविरोधात सुरू होईल, असा इशारा राऊत यांनी दिला. महाराष्ट्र जात पात अन् धर्मात तुटू नये अशी बाळासाहेबांची भूमिका होती. या सर्व भेदांना दूर ठेऊन मराठी माणसांना एकत्र आणणं, या बाळासाहेबांच्या भूमिकेतून शिवसेना उभी राहिली. जात पात धर्म न पाहता फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशीच बाळासाहेबांची भूमिका होती. पण, देवेंद्र फडणवीसांना हे कधीच कळणार नाही, असे राऊत म्हणाले.

मोदी-शहांच्या कृपेने फडणवीसांना मुख्यमंत्रीपद 

मागील युती सरकारच्या काळात फडणवीसांना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं यावरही राऊतांनी भाष्य केलं. अनुभव आणि कर्तबगारी यांमुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. ही मोदी-शहांच्या भाजपाची परंपरा आहे. खरंतर मुख्यमंत्रीपदावर पहिला हक्क गोपीनाथ मुंडे यांचा होता. आज ते आपल्यात नाहीत. त्यानंतर दुसरा हक्क एकनाथ खडसे यांचा होता. फडणवीसांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात खडसेंचाच मोठा वाटा होता, असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis : फडणवीस CM, त्यात चुकीचं काय? शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube