Reliance Industries : फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ मध्ये अंबानींच्या रिलायन्सची बाजी; बीएमडब्ल्यू, नेस्लेलाही टाकलं मागे
Reliance Industries in Forbes Global 2000 : फोर्ब्स (Forbes) या जागतिक संस्थेने नुकतचं त्यांच्या ‘ग्लोबल 2000’ ची (Global 2000) यादी जाहिर केली. या यादीमध्ये जगभरातील टॉप 2000 कंपन्यांचा समावेश आहे. या यादीमध्ये भारतातील आघाडीच्या आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries) बाजी मारली आहे. रिलायन्सला या यादीमध्ये 45 वं स्थान मिळालं आहे. तर गेल्या वेळेच्या तुलनेत रिलायन्सने यामध्ये आठ स्थानांनी पुढे सरसावले आहे. (Reliance Industries got 45 rank in Forbes Global 2000 overtakes BMW and Nestle )
नितीश कुमारांचा प्लॅन कळला, थेट राजीनामाच दिला; बिहारी राजकारणात नवा ट्विस्ट!
फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ या यादीत असणाऱ्या भारतीय अरबपतींच्या तुलनेत ते सर्वोच्च स्थानावर आहेत. तर जगभरामध्ये त्यांनी बीएमडब्ल्यू, नेस्लेलाही मागे टाकलं आहे. तर फोर्ब्स ही संस्था या कंपन्यांचं रॅंकिंग करताना त्या कंपन्यांची विक्री, लाभ, संपत्ती आणि बाजार मुल्य यांच्या आधारे त्यांचं ‘ग्लोबत 2000’ या यादीतील स्थान ठरवते.
क्रिकेटच्या बॉलवर अंगठी ठेवत चेन्नईच्या तुषार देशपांडेचा अनोख्या पद्धतीने साखरपुडा
रिलायन्स इंडस्ट्रीजची विक्री 109.43 अरब अमेरिकन डॉलर तर 8.3 अरब अमेरिकन डॉलर एवढा या कंपनीचा लाभ आहे. या समुहाचा कारभार हा तेलापासून ते दूरसंचारपर्यंत विस्तारलेला आहे. त्यामुळे रिलायन्सला या यादीमध्ये 45 वं स्थान मिळालं आहे. तर त्यांनी जर्मनीच्या बीएमडब्ल्यू, स्वित्झर्लंडच्या नेस्ले, चीनच्या अलीबाबा समूह, अमेरिकन प्रॉक्टक अॅंड ग्लोबल आणि जापानच्या सोनी या जगातील प्रसिद्ध कंपन्यांना मागे टाकले आहे.
फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ मध्ये भारतातील कोण-कोणत्या कंपन्या?
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच भारतातील इतरही कंपन्यांना या फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ यादीमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामध्ये भारतीय स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ओएनजीसा, एलआयसी, टीसीएस, अॅक्सिस बॅंक, एनटीपीसी, लार्सन अॅंड टुब्रो, भारती एअरटेल, कोटक महिद्रा बॅंक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, इन्फोसिस, बॅंक ऑफ बडोदा, अदानी एन्टरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स अॅंड स्पेशल अकॉनॉमिक झोन या कंपन्याचा समावेश आहे.