नितीश कुमारांचा प्लॅन कळला, थेट राजीनामाच दिला; बिहारी राजकारणात नवा ट्विस्ट!

नितीश कुमारांचा प्लॅन कळला, थेट राजीनामाच दिला; बिहारी राजकारणात नवा ट्विस्ट!

Bihar Politics : पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची एकजूट करण्यास निघालेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना त्यांच्याच गृहराज्यात जोरदार झटका बसला आहे. बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी (Santosh Manjhi) यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

पाटण्यात येत्या 23 जून रोजी देशभरातील विरोधी पक्षांचे प्रमुख येणार आहेत. येथे मोठी बैठक होणार आहे. मात्र, त्याआधीच बिहारच्या राजकारणात या घडामोडी घडू लागल्याने महाआघाडीला हादरे बसू लागले आहेत.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

राजीनाम्यानंतर संतोष मांझी म्हणाले, जेडीयूने पक्ष विलय करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव आम्ही नामंजूर केला आहे. पक्षच विलीन करण्यापेक्षा वेगळा रस्ता स्वीकारणे केव्हाही चांगलेच. संतोष मांझी हे नितीश यांच्या मंत्रिमंडळात लघु सिंचन आणि एससी, एसटी कल्याण विभागाचा कार्यभार सांभाळत होते.

ते पुढे म्हणाले, तीन दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पक्ष विलय करण्यासाठी दबाव टाकला. भारतीय जनता पार्टीबरोबर युतीच्या प्रश्नावर मांझी म्हणाले, अजून याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका आमचा पक्ष स्वबळावरही लढू शकतो.

काँग्रेस आमदाराचा दिव्य प्रताप; बसचा रिव्हर्स गिअर टाकत गाड्यांचा केला चक्काचूर

आम्ही अजून महाआघाडीतच आहोत. मंत्रीपदी असतानाच महाआघाडीत असायला हवे असे काही नाही. जर पक्ष म्हणून मान्यताच मिळणार नसेल तर आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय राहत नाही. आम्ही आजही नितीश कुमार यांना मानतो. मात्र, जर आपण घर तयार केले असेल तर ते घर आपल्याच हाताने तोडणे शक्य नाही. आम्ही खूप मेहनत घेऊन पक्ष तयार केला. राज्यात त्याचे अस्तित्व निर्माण केले, असे संतोष मांझी यांनी सांगितले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी काही दिवसांपूर्वी आमदारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. त्यांनी पक्षासाठी लोकसभा निवडणुकीत पाच जागांची मागणी केली होती. जीतन राम मांझी सध्या महाआघाडीत नाराज असल्यााचीही चर्चा सध्या सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube