Download App

उपराष्ट्रपतिपदासाठी 9 डिसेंबरला होणार निवडणूक, कोण घेणार जगदीप धनखड यांची जागा?

निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे

  • Written By: Last Updated:

Vice President Election : निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी (१ ऑगस्ट) उपराष्ट्रपतीपदाची (Vice President Election ) निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत नामांकन दाखल केले जाईल. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल.

आता स्पोर्ट्स विभागात रमी स्पर्धा होणार…, अंबादास दानवेंचा कोकाटेंवर हल्लाबोल  

निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. आयोगाच्या परिपत्रकानुसार, ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तर २१ ऑगस्ट ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्जांची छाननी केली जाईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाईल.

कशी होते उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक?
उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांद्वारे केली जाते. यामध्ये, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार मतदान करतात, मग ते निवडून आलेले असोत किंवा नामांकित असोत. ही प्रक्रिया गुप्त मतदानाद्वारे केली जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक पोस्टल मतपत्रिकेद्वारे केली जाते.

संसदेत एनडीएला बहुमत
लोकसभेतील एकूण ५४२ सदस्यांपैकी एनडीएकडे २९३ सदस्य आहेत. तर इंडिया आघाडीकडे २३४ सदस्य आहेत. राज्यसभेतील २४० सदस्यांपैकी एनडीएला सुमारे १३० खासदारांचा पाठिंबा आहे आणि इंडिया आघाडीला ७९ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएला ४२३ खासदारांचा पाठिंबा आहे आणि इंडिया आघाडीला ३१३ खासदारांचा पाठिंबा आहे.

फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे मला दोनदा नाही, तर तीनवेळा भेटले अन् त्यात मंत्रिमंडळाची… 

जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा
माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राजीनामा दिला होता. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धनखड यांचे केंद्र सरकारशी संबंध चांगले चालत नव्हते आणि म्हणूनच धनखड यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचं विरोधक सांगत आहेत.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी भाजप कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांच्या नावांचा विचार करत आहे. तर इंडिया आघाडीकडून संयुक्त उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे.

follow us