फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे मला दोनदा नाही, तर तीनवेळा भेटले अन् त्यात मंत्रिमंडळाची…

फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे मला दोनदा नाही, तर तीनवेळा भेटले अन् त्यात मंत्रिमंडळाची…

Devendra Fadnavis on Dhananjay Munde : राज्यातील मंत्रिमंडळामध्ये (State Cabinet) अचानक गुरुवारी सायंकाळी खांदेपालट करण्यात आला. विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची (Manikrao Kokate) उलचबांगडी करत त्यांच्या जागी कृषीमंत्रीपद दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांच्याकडे सोपवण्यात आलं. याचदरम्यान, धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पुन्हा एकदा कृषिखांत मिळावं यासाठी लॉबिंग केल्याची चर्च होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला.

रमी खेळणं भोवलं; माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद जाता-जाता खातं गेलं, काय दिली पहिली प्रतिक्रिया? 

मुख्यमंत्री फडणवीसांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. धनंजय मुंडेंनी दोन भेटी घेतल्याच्या चर्चांवर फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी धनंजय मुंडेंनी माझी तीनवेळी भेट घेतल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे. ती वेगवेगळ्या कारणांनी घेतली होती. धनंजय मुंडेंसोबतच्या कोणत्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे करतो, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळं सध्यातरी मुंडे यांचं मंत्रिमंडळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ब्रेकिंग : आक्षेपार्ह पोस्टवरून यवतमध्ये दोन गट भिडले; पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या 

फडणवीस म्हणाले, जी काही घटना घडली, त्यानंतर एक मोठा रोष होता, त्यासंदर्भात अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेनंतर कोकाटेंचं खातं बदललं आहे. आणि कृषी खातं दत्ता भरणे यांना देण्यात आलंय. आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

कोकाटेंना फडणवीसांची तंबी..
यावेळी बोलतांना फडणवीसांनी कोकाटेंचेही कान टोचले. फडणवीस म्हणाले, आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपण जनतेची सेवा करण्यासाठी इथं आलो आहोत आणि जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, काय करतो, कसे बोलतो, या सर्व गोष्टी दिसतात आणि त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अशी तंबीच फडणवीसांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube