Digital Begging Trend Video Viral On Socal Media : सामान्य लोकांना सरकारी सेवा सहज मिळू शकतील या उद्देशाने डिजिटल इंडियाचे स्वप्न सुरू करण्यात आले होते. आज ही योजना मोठी यशस्वी झाली असून, दिवसेंदिवस या क्रांतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या डिजीटल क्रांतीमुळे अनेकांनी YouTube आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएट करून पैसा कमावला. पण आता याच डिजीटल क्रांतीचं पुढचं व्हर्जन म्हणा किंवा एक विचिक्ष ट्रेंड समोर आला आहे. सध्या या ट्रेंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमका हा नव्याने उदयास आलेला ट्रेंड काय? याबद्दल जाणून घेऊया…
भारीच! देशातील तब्बल 6 कोटी शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; यूपी अन् महाराष्ट्राची आघाडी
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नग्नावस्थेत कॅमेरासमोर बसलेला दिसून येत आहे. या व्यक्तीसमोर एक QR कोड ठेवलेला असून, ही व्यक्ती YouTube वर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या स्ट्रिमिंगमध्ये ही व्यक्ती ना कोणतं गाणं म्हणत आहे किंवा कुणाला उद्देशून काही संदेश देत नव्हता. तर, फक्त UPI QR कोड समोर ठेवून बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे YouTube QR कोड घेऊन लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या व्यक्तीला अनेकजण कोड स्कॅन करून ऑनलाईन पैसे पाठवत होते.
मेसेजिंग, पेमेंट अन् डेटिंग होणार एकत्र, Elon Musk लॉन्च करणार XChat; जाणून घ्या भन्नाट फीचर्स
असे अनेक व्हिडिओ…
ऑनलाईन QR कोड घेऊन बसलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यावर नेटिझन्सकडून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ज्यात एका यूजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पहिल्यांना X वर शेअर करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, अशाप्रकारे पैसे मागण्याचे अनेक अकाऊंट पाहण्यात आल्याचेही एका यूजरने म्हटले आहे.
टेन्शनचं संपलं राव! WhatsApp वर येणार ‘Log Out’ फीचर; सतत येणाऱ्या मेसेजमधून मिळणार ‘ब्रेक’
तर, दुसरीकडे एका यूजरने कमेंट केली आहे की, “मी अशाच एका माणसाला पाहिले जो दिवसभर स्क्रीनसमोर बसून म्हणतो – मला खोलीच्या भाड्यासाठी 50 रुपये हवे आहेत. अशाप्रकारे पैसै मागून संबंधित व्यक्तीने आपण UPI द्वारे दररोज 5 ते 10 हजार कमवत असल्याचाही दावा केला आहे. एकूणच काय तर, एकीकडे डिजीटल माध्यमांचा वापर करून अनेकजण त्यांच्यातील कला सादर करत पैसे कमवत आहे तर, दुसरीकडे भीक मागणाऱ्या व्यक्तींनीही त्यांचा ट्रेंडमध्ये बदलत आता डिजीटल माध्यमातून भीक मागण्यास सुरूवात केल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हि़डिओमुळे समोर येत असून, अनेक यूजर्स अशा व्यक्तींना पैसे पाठवत आहेत.
Wtf
Bc Online Bheekh mang rhe h log 😂😂 pic.twitter.com/t8SLCAlxjJ— ᴛʀᴏʟʟɪɴɢ ɪꜱ ᴀɴ ᴀʀᴛ (@Trolling_isart) June 2, 2025