घरातच निघाले बेईमान: पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्या ८ जणांना अटक; वाचा, प्रत्येकाची A टू Z कहाणी

Spies Provided Information to Pakistan Arrested : ऑपरेशन सिंदुरनंतर संपूर्ण देश एका समाधानी असल्याच्या वातावरणात असतानाच देशातीलच काही लोक पाकिस्तानला गुप्तचर माहिती देत असंल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदुरनंतर, पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली 3 राज्यांमधून तब्बल 8 जणांना अटक केली आहे. ही हेरगिरी अनेक वर्षांपासून सुरू होती, तीही फक्त काही पैशांसाठी. यापैकी ४ आरोपी हरियाणाचे, ३ पंजाबचे तर 1 जण उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशी विधानप्रकरणी विजय शाहंना दणका; SIT स्थापन करण्याचे SC चे आदेश
या यादीत प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राच नाव आहे, जी हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आली आहे. हिसारचे एसपी शशांक कुमार यांनी सांगितलं की, शत्रू देश म्हणजे पाकिस्तान आपल्या सोशल मीडियावर जे प्रसिद्ध आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. ही लोक पैशाच्या लोभामुळं या मार्गाला जाऊन त्यांच्या संपर्कात जातात असं ते म्हणाले आहेत.
ज्योती मल्होत्रा
हरियाणातील हिसार येथे राहणारी ज्योती मल्होत्रा ’ट्रॅव्हल विथ जेओ’ नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवते. ३३ वर्षीय ज्योतीला गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली. ज्योतीवर भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होती आणि तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली आहे. पाकिस्तानी एजन्सींना ज्योतीला त्यांचा गुप्तहेर बनवायचं होतं.
देवेंद्र सिंग ढिल्लन
पटियाला येथील खालसा कॉलेजचा विद्यार्थी देवेंद्र सिंग ढिल्लन याला पोलिसांनी १२ मे रोजी हरियाणातील कैथल येथून अटक केली. २५ वर्षीय देवेंद्र फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुका घेऊन फोटो पोस्ट करायचा. चौकशीदरम्यान तो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानला गेल्याचं उघड झालं. त्याने आयएसआयला पटियाला लष्करी तळाची गुप्त माहितीही दिली होती.
नोमान इलाही
नोमन इलाही हरियाणामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नोमानला पानिपत येथून अटक केली. समोर आलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय नोमान हा पाकिस्तानमधील एका आयएसआय हँडलरच्या संपर्कात होता. नोमान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. भारताबद्दल गुप्तचर माहिती देण्याच्या बदल्यात नोमानला पाकिस्तानकडून पैसे मिळत असत.
अरमान
१६ मे रोजी, गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलिसांनी २३ वर्षीय अरमानला हरियाणातील नूह येथून अटक केली. अलिकडेच निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अरमान पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवत असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. पोलिसांकडं याचे बरेच पुरावे आहेत.
शहजाद
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे राहणारा शहजाद हा व्यवसायाने व्यापारी आहे. स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मुरादाबाद येथून शहजादला अटक केली आहे. शहजादने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती आयएसआय हँडलर्सना दिली आहे. शहजादने अनेक वेळा पाकिस्तानलाही भेट दिली आहे. याशिवाय, तो मसाले, कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी आहे.
मोहम्मद मुर्तझा अली
मोहम्मद मुर्तजा अलीला गुजरात पोलिसांनी जालंधर येथून अटक केली. गुप्तचर यंत्रणांना संशय होता की, मोहम्मद पाकिस्तानी एजन्सी आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. मोहम्मदने स्वतः एक मोबाईल अॅप तयार केलं होतं ज्याद्वारे तो पाकिस्तानी एजन्सींना गुप्तचर माहिती पाठवत असे. मोहम्मदकडे पोलिसांना ४ मोबाईल फोन आणि ३ सिम कार्ड सापडले आहेत.
याशिवाय पोलिसांनी पंजाबमधून गजाला आणि यामिन मोहम्मद यांना अटक केली आहे. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अटक केलेल्या सर्वांकडून इतर आणखी काय काय यांनी केलं आहे किंवा कुणाच्या संपर्कात होते? काय माहिती दिली आणि आणखी कोण सहभागी आहे यावर तपास सुरू आहे.