Download App

निवडणूक आयोग आज करणार विधानसभा निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार.

Election Commission of India : केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची (Election Commission of India) पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेतील काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विधानसभेचा (Maharashtra Elections) कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे याआधीच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभा निवडणूक 30 सप्टेंबरच्या आधी करण्याचे नियोजन केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नुकताच जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यांचा दौरा केला होता. महाराष्ट्राचा दौरा अजून झालेला नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा होणार का याबाबत स्पष्टता नाही. जम्मू काश्मीर राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या एका पथकाने राज्याचा दौरा केला होता. येथील निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला होता.

यानंतर 30 सप्टेंबरच्या आत राज्यातील विधानसभा निवडणुका होतील अशी योजना आयोगाने तयार केली आहे. विशेष म्हणजे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही केली जात आहे. जम्मू काश्मीरप्रमाणेच हरियाणा,  महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांतही निवडणुका होणार आहेत.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. झारखंड विधानसभेचा (Jharkhand Assembly Elections) कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. हरियाणात सध्या भाजप सरकार आहे. विधानसभे भाजपाचे 40 आमदार आहेत. तर जेजेपी 10, आयएनएलडी 1, हरियाणा लोकहित पार्टी 1 आणि सात अपक्ष आमदार आहेत.

महाराष्ट्र, हरियाणा अन् झारखंड.. चार राज्यांत काँग्रेसची हवा? सोनिया गांधींचा दाव्यात किती खरं..

follow us