Download App

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर; तर, सदस्यपदी डॉ. अर्चना मजुमदार यांची नियुक्ती

महिला आयोगाच्या नव्या कार्यकारिणीत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विजया रहाटकर यांचीि अध्यक्षपदी नियुक्त झाल्या आहेत

  • Written By: Last Updated:

Vijaya Kishore Rahatkar : भाजपच्या पदाधिकारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. तर डॉ अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या नव्या कार्यकारिणीत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर; नियुक्तीचं गॅझेटही प्रसिद्ध

कोण आहेत विजया रहाटकर?

विजया रहाटकर यांचा अतिशय खडतर व संघर्षमय प्रवास आहे. त्या तत्कालीन औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या. त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असा त्यांचा प्रवास आहे.त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.

अनेक उपक्रम राबविले

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून 2016 ते 2021 या कालावधीत त्यांची नियुक्ती झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी “सक्षमा”, “प्रज्ज्वला”, “सुहिता” यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. “सक्षमा” उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. त्यांनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे “साद” नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते.

अनेक पुस्तकेही लिहिली

भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजया रहाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये ‘विधिलिखित’ या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , ‘अग्निशिखा धडाडू द्या’, ‘औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स’, ‘मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम’ यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

follow us

संबंधित बातम्या