महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर; नियुक्तीचं गॅझेटही प्रसिद्ध
Rupali Chakankar : राज्याच्या महिला आयोगाच्यड अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा (Rupali Chakankar) कार्यकाळ येत्या 22 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे चाकणकर यांच्यानंतर अध्यक्षपदी कुणाला संधी दिली जाणार असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे. चाकणकर यांच्या नियुक्तीचे गॅझेटही प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या आमदाकीसाठी रुपाली चाकणकर यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, त्यांच्या नावाला पक्षातून विरोध झाला.
विधानसभा लढण्याची माझी तयारी, खडकवासल्यातून.. रुपाली चाकणकरांचे मोठं विधान
मंगळवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. ही घोषणा होण्याच्या अगोदर राज्यपालांनी विधानपरिषदेत सात आमदारांची नियुक्ती केली. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना शपथ दिली. या सात आमदारांत तीन भाजप, दोन शिंदे गट आणि दोन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांना संधी मिळाली. या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं.
विधानपरिषदेवर त्यांना संधी मिळेल अशी चर्चा आधी होती. परंतु, पक्षातूनच त्यांच्या नावाला विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. त्यामुळे राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं. तरी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बच्चे मन के सच्चेच असतात, पण काही खोड्या काढणारे; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना टोला
विधानपरिषदेवर राज्यपालांनी कुणाला संधी दिली?
विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांपैकी 7 जागांवर रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी दिली आहे. अजित पवारांच्या कोट्यातून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे.