Download App

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई कालवश

  • Written By: Last Updated:

अहमदाबाद :  घराघरात लोकप्रिय असलेल्या वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Street Dog Attack) ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल (दि.22) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परिशा असा परिवार आहे. (Wagh Bakri Tea Executive Director Parag Desai Passes Away)

Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना

15 ऑक्टोबर रोजी सकाळी इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉक करत असताना देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यात स्वतःला वाचवताना ते घराजवळ पाय घसरून पडले होते. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनंतर त्यांना तातडीने अहमदाबादच्या प्रल्हादनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडू लागल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र काल संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह

न्यूयॉर्कमधून केले होते MBA

प्रसिद्ध चहा समूहाचे चौथ्या पिढीतील उद्योजक देसाई यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले होते.पराग देसाई यांनी वाघ बकरी चहा समूहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागात काम करताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. देसाई यांना केवळ चहाचीच आवड नव्हती, तर त्यांना प्रवास आणि वन्यजीवांमध्ये रस होता.

2000 कोटींहून अधिक उलाढाल

1995 मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर कंपनीचे बाजार मूल्य 100 कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तेव्हा देसाई यांनी वाघ बकरी चहा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.आज त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि 5 कोटी किलोग्रॅम चहाचे वितरण करणारी भारतातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक बनली आहे. वाघ बकरी चहा समूह भारतीय  24 राज्यांमध्ये कार्यरत असून  कंपनीची उत्पादने सुमारे 60 देशांमध्ये निर्यात केली जातात.

Tags

follow us