Download App

10 विरोधी खासदारांचे निलंबन…मिटिंगमध्ये गोंधळ, जेपीसीच्या बैठकीत काय झाले?

Waqf 10 Opposition MPs Suspended In JPC Meeting : वक्फ कायद्यातील दुरुस्तीबाबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत पुन्हा एकदा गदारोळ (Waqf Bill) झालाय. अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर बैठकीची तारीख आणि अजेंडा बदलल्याचा आरोप करत विरोधकांच्या खासदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या प्रस्तावावर 10 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात (Waqf 10 Opposition MPs Suspended) आले.

प्रवाशांना मोठा ‘धक्का’, ST बसची भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या नवीन दर

विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर जेपीसीची बैठक सुरळीत पार पडली. यामध्ये जम्मू-कश्मीर मुताहिदा मजलिस-ए-उलेमाचे प्रमुख हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीर वाइज उमर फारूख यांनी भाषण केलं. जेपीसीची बैठक सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा अजेंडा आणि तारीख बदलल्याचा आरोप करत गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभापतींना घरातील नोकरांप्रमाणे वागणूक दिल्याचा आणि सरकारच्या सूचनेनुसार काम केल्याचा आरोप केला. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या मते, बैठकीदरम्यान सभापतींना सतत फोन येत होते, ज्यामध्ये सरकारकडून सूचना दिल्या जात होत्या.

विरोधी खासदार का नाराज आहेत?

विरोधी खासदारांच्या नाराजीचे खरे कारण म्हणजे 27 जानेवारीला बोलावलेली बैठक आहे. यामध्ये प्रस्तावित दुरुस्त्यांवर टप्प्याटप्प्याने चर्चा होणार होती. संसदीय समितीने 29 जानेवारीला अहवाल सादर करण्याचे लक्ष्य ठेवलंय. परंतु, विरोधी खासदार 30 किंवा 31 जानेवारीनंतर बैठक घेण्याची मागणी करत होते. कल्याण बॅनर्जी यांनी आरोप केलाय की, जेपीसी अहवाल आणण्याच्या घाईचे कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक आहे. जेणेकरून 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय फायदा घेता येईल.

काळा घोडा कला महोत्सवात मोठी नाट्य पर्वणी; चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

जगदंबिका पाल यांनी विरोधी खासदारांचे आरोप फेटाळून लावले. जेपीसीचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. आता त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करावा लागणार आहे. पाल यांच्या म्हणण्यानुसार, विरोधी सदस्यांना सभा सुरू राहावी, असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. याआधीही कल्याण बॅनर्जी यांच्यावर सभेदरम्यान असंसदीय वर्तनाचे आरोप झालेत. एकदा मीटिंगमध्ये रागाच्या भरात पाण्याची बाटली फोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली होती.

बैठकीतील आपल्या सादरीकरणात उमर फारूख यांनी वक्फ कायद्यातील सुधारणांना विरोध केला. त्यांच्या मते, ज्या प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना सुधारणांमध्ये वक्फ मालमत्ता निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आलेत. त्यामुळे वक्फ मालमत्ता सरकारी मालमत्तेत रूपांतरित होईल.

 

follow us