निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघू बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंच्या सूचना

  • Written By: Published:
निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघू बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंच्या सूचना

MLA Asutosh Kale On Nilwande dam water rotation : अहिल्यानगरः मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्याप्रमाणेच यावर्षी देखील नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेवून निळवंडे (Nilwande) डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, गाव बंधारे, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आमदार पोहेगाव पोलीस दुरुक्षेत्र कार्यालय पूर्ववत सुरु करा, आ.आशुतोष काळेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना (Asutosh Kale) यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.


काळा घोडा कला महोत्सवात मोठी नाट्य पर्वणी; चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

चालू वर्षी सर्वच धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. निळवंडे धरण देखील अपवाद नाही. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे साहजिकच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. मागील वर्षी पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जिरायती भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवली नाही.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली नाही व टँकरवर होणारा भरमसाठ खर्च देखील वाचला आहे. त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावे मागील कित्येक दशकांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत होती. कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या जिरायती गावातील नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या अडचणी सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नातून निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

या सर्व लाभक्षेत्राच्या गावातील सर्व पाझर तलाव, लघू बंधारे, गावबंधारे व पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची नासाडी होणार नाही याचे योग्य नियोजन करून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव व लघू बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे.

जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube