Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं

Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं

Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat)


Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीला संपवलं; पेट्रोल टाकत जाळला मृतदेह, वेबसिरीज पाहून केलं प्लॅनिंग

राधाकृष्ण विखे म्हणाले, निळवंडे कालव्‍यातून पाणी येण्‍याचा आनंद हा एखाद्या सण उत्‍सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांची या भागातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपली. या विषयावर आरोप-प्रत्‍यारोप करण्‍यापेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्‍वप्‍न पूर्ण होत असल्‍याचे समाधान सर्वांनी मानले पाहिजे, असं ते म्हणाले.

ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…

जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण डाव्‍या कालव्‍यातून सोडण्‍यात आलेले पाणी तालुक्‍यातील गोगलगाव आणि आडगाव या लाभक्षेत्रातील गावांमधून मार्गस्‍थ झाले. या दोन्‍हीही गावातील ग्रामस्‍थांनी जल्‍लोषात पाण्‍याची विधीवत पूजा करुन, आपला आनंद साजरा केला.

LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच

यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करीत युवकांनी आपला आनंदोत्‍सव साजरा केला. महिलांनी अतिशय उत्‍साहाने पाण्‍याचे पूजन आणि औक्षण करुन या क्षणाचा आनंद व्दिगुणीत केला.

याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक, अभि‍यंता कैलास ठाकरे, विवेक लव्‍हाट, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा बॅकेचे उपाध्‍यक्ष मच्छिंद्र थेटे यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube