West Bengal MLA Salary: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी (7 सप्टेंबर) रोजी आमदारांच्या वेतनात MLA salary) पगारात वाढ करण्याची घोषणा केली. आमदारांच्या पगारात दरमहा 40 हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. ही वेतनवाढ करताना सीएम ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत सांगितले की, माझ्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही, कारण मी बऱ्याचं काळापासून कोणत्याही प्रकारचा पगार घेत नाही.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
बॅनर्जी म्हणाल्या, पश्चिम बंगाल विधानसभेच्या आमदारांचा पगार अन्य राज्यांतील आमदारांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात दरमहा 40 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या पगारातही वाढ
याशिवाय ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पगारात वाढ केली आहे. आता राज्यमंत्र्यांचे मासिक वेतन 10,900 रुपयांवरून 50,900 रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या बाबतीत ही रक्कम 11,000 रुपयांवरून 51,000 रुपये करण्यात आली आहे. मासिक वेतनाव्यतिरिक्त, इतर अतिरिक्त भत्ते जे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि आमदारांना मिळण्यास पात्र आहेत ते तसेच राहतील.
मोठी बातमी : खोतकरांच्या शिष्टाईला ‘थोडेसे’ यश; जरांगे पाटील CM शिंदेंशी मुंबईत चर्चेसाठी तयार
एकूण पगार किती असेल?
याचा अर्थ आमदारांना वेतन आणि भत्त्यांसह वास्तविक मासिक वेतन आता 81,000 रुपये प्रति महिना या दरावरून 1.21 लाख रुपये होईल, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे, आतापासून मंत्र्यांना मिळणारे मासिक वेकन 1.10 लाख रुपये प्रति महिना वरून सुमारे 1.50 लाख रुपये प्रति महिना होईल.
या कारणामुळं वेतनवाढ
गुरुवारी राज्याच्या विधानसभेत वाढीव पगाराची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील आमदारांचे पगार इतर राज्यातील आमदारांच्या पगारापेक्षा खूपच कमी आहेत, हे लक्षात घेऊन पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मंत्री आणि आमदारांच्या या वाढलेल्या पगारामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी त्रास होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी मिळावी, अशी त्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.