Download App

जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचं ‘अजब’ विधान, म्हणाले, मुस्लीम राष्ट्रात…

पश्चिम बंगालमध्ये जोडप्याला रस्त्यात मारहाण करण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर आमदार रहमान यांनी प्रतिक्रिया दिली.

Bengal Woman Thrashed : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे एका जोडप्याला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या माराहणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Viral video) सदर व्हिडीओत मारहाण करणारा आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी याला पोलिसांनी अटक केली आहे. (West Bengal) आरोपी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा विधानसभेचे तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं. सदर घटना समोर आल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी एक वादग्रस्त विधान केल असून आता विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला घेरल आहे.

Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले

माध्यमांशी बोलताना आमदार रहमान म्हणाले, ‘आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण त्या महिलेनेही चुकीचं कृत्य केलं. तिनं स्वतःचा नवरा, मुलगा आणि मुलीला सोडून दिला आणि ती दृष्ट बनली. अशा कृत्याविरोधात मुस्लीम राष्ट्रात काही नियम आणि न्याय पद्धती आहे. तरीही जे झालं, ते थोडं अती होतं. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी मात्र आमदार रहमान यांच्या मुस्लीम राष्ट्र या विधानावर चिंता व्यक्त केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी रहमान यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आमदार रहमान यांनी मुस्लीम राष्ट्राचा दाखला देऊन कोणत्यातरी कायद्याप्रमाणे शिक्षेचे प्रावधान असल्याचे म्हटले. हा गंभीर चिंतेचा विषय आहे’, असं कॅप्शन मुजूमदार यांनी लिहिलं आहे.

परळीच्या खून प्रकरणात रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, धनंजय मुंडेंचे राईट आणि लेफ्ट हॅंन्ड…

विरोधकांच्या आरोपांवर टीएमसीनेही उत्तर दिलं आहे. टीएमसीचे जिल्हाध्यक्ष कनय्यालाल अग्रवाल म्हणाले की, ‘मारहाण करण्यात आलेल्या स्त्री आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होतं. म्हणून साळिशी सभा घेण्यात आली होती. परंतु, ताजिमुलने जे केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत.’

follow us

वेब स्टोरीज