आधी नोकरीचे आमिष, मग बलात्कार केला; पद्मश्री कार्तिक महाराजांवर महिलेचा गंभीर आरोप

आधी नोकरीचे आमिष, मग बलात्कार केला; पद्मश्री कार्तिक महाराजांवर महिलेचा गंभीर आरोप

Padma Shri Karthik Maharaj : भारत सेवाश्रम संघाशी संबंधित आणि पद्मश्री पुरस्कार विजेते कार्तिक महाराज (Karthik Maharaj) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महाराजांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने आपली फसवणूक केली आणि नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पश्चिम बंगालमधील (West Bengal)  महिलेने केला आहे. या प्रकरणी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नाबग्राम पोलिस ठाण्यात (Nabgram Police Station) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कार्तिक महाराज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

जमिनीच्या तुकड्यासाठी काकू अन् चुलत भावाचे केले कुऱ्हाडीने तुकडे; वर्धा जिल्ह्यातील क्रूर घटना 

तक्रारदार महिलेने आपली ओळख गुप्त ठेवत माध्यमांशी बोलताना सांगितले की, २०१३ मध्ये कार्तिक महाराजांनी आपल्याला प्राथमिक शाळेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने मुर्शिदाबाद येथील एका आश्रमात घेऊन गेले. आपली शिक्षिका म्हणून नियुक्त केली. त्याच आश्रमाच्या परिसरात राहण्यासाठी एक खोलीही दिली.  एका रात्री कार्तिक महाराज अचानक आपल्या खोलीत आले आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला, असा महिलेचा आरोप आहे. आपण विरोध केला तेव्हा मानसिक दबाव आणि धमकी देऊन तिला संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले, असा महिलेचा दावा आहे. पोलिसात तक्रार केल्यास आपण आत्महत्या करू, अशी धमकीही महाराजांनी दिली होती, असं तक्रारदार महिलेने सांगितले.

‘मी खामेनीला मृत्यूपासून वाचवले…’अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा  

पोलिसांनी काय म्हटले?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली नबग्राम पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि वैद्यकीय तपासणीसह इतर कायदेशीर प्रक्रिया देखील अवलंबल्या जात आहेत.

आरोपी कार्तिक महाराज हा भारत सेवाश्रम संघाच्या बेलडांगा मठाशी संबंधित आहे. त्यांनी  त्यांच्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. आपण एक संन्यासी आहेत आणि संन्यासाच्या मार्गात असे अडथळे येत राहतात. आपण न्यायव्यवस्थेचा आदर करतो. आपले वकील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडतील, असं ते म्हणाले.

कार्तिक महाराज भारतीय जनता पक्षाचे जवळचे मानले जाते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर यापूर्वी अनेकदा भाजपला निवडणुकीत मदत केल्याचा आरोप केला. अशा परिस्थितीत, या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. सध्या या प्रकरणात भारत सेवाश्रम संघाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube