West Bengal : बंगालमध्ये हल्लेखोरांच्या गोळीबारात TMC नेत्याचा मृत्यू

West Bengal : बंगालमध्ये हल्लेखोरांच्या गोळीबारात TMC नेत्याचा मृत्यू

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना (West Bengal) सातत्याने घडत असतात. आताही अशीच थरारक घटना राज्यात घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसचे नेते (TMC) सत्यन चौधरी यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) राज्यातील बहरामपूर भागात घडली. हल्लेखोर दुचाकीवर होते चौधरी यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. यानंतर हल्लेखोर पसार झाले. चौधरी यांना मुर्शिदाबाद येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

एका स्थानिक टीएमसी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काही लोक दुचाकीवर आले आणि त्यांनी अगदी जवळून चौधरींवर गोळीबार केला. तसं पाहिले तर मागील काही दिवसांपासून चौधरी पक्षावर नाराज होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचा फार संवाद राहिलेला नव्हता. रविवारी दुपारी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. हिंसाचाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन टॅप, अपघातामागे ‘टीएमसी’चे षडयंत्र; भाजप नेत्याच्या आरोपांनी खळबळ!

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज