भाजपमध्ये घराणेशाही आहे का, या प्रश्नांवर काय म्हणाले अमित शहा?

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात (Karnataka Assembly Elections) चर्चा सुरु होती. तेव्हा एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं. कर्नाटक विधानसभेची मुदत २४ मे […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात (Karnataka Assembly Elections) चर्चा सुरु होती. तेव्हा एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.

कर्नाटक विधानसभेची मुदत २४ मे २०२३ रोजी संपणार असून सर्व २२४ जागांसाठी मे २०२३ पूर्वी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण रंगात येताना दिसत आहे. अनेक पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस किंवा विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांवर कुरघोडीसाठी घराणेशाहीच्या विरोधात भाजपकडून आवाज उठविला जातो. आमच्याकडे घराणेशाहीला अजिबात थारा नाही, असा दावा भाजप नेते करतात. मात्र, कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाकडून भाजपवर घराणेशाहीचे आरोप होत आहेत. या मुलाखतीत अमित शहा यांना विचारण्यात आले की जनता दल सेक्युलर भाजपवर घराणेशाहीचे करत आहे.

Thackeray Vs Shinde : पक्षांतरबंदी कायदा, अध्यक्षपद, नबाम रेबिया, ठाकरे गटाने काय युक्तिवाद केला?

यावर उत्तर देतांना अमित शहा म्हणाले की, भाजपमध्ये काही राजकारण्यांची दुसरी पिढी किंवा तिसरी पिढी राजकारणात आहे, हे चित्र भाजपमध्येही आहे. मात्र पक्षाचा अध्यक्ष एकाच कुटुंबातून होईल, असे आमच्या पक्षात नाही. किंवा संपूर्ण कुटुंब खासदार किंवा आमदार होईल, हे देखील भाजपमध्ये नाही. ही कोणत्या प्रकारची तुलना आहे? नागरिकांच्या डोळ्यांत धुळफेक करून भाजपवर घराणेशाहीहीचे आरोप केले जाते आहेत. भाजवर घराणेशाहीचे धुळफेक करणारे आरोप करून तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही लपवता येणार नाही, अशा शब्दात गृहमंत्री शहा यांना पलटवार केला.

 

Exit mobile version