What exactly was the murder case in which Atiq Ahmed went to jail for the first time? : चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अतिकच्या मृत्यूनंतर त्याच्या कारनाम्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. असेच एक प्रकरण 1990 सालचे आहे, ज्यात अतिकचा धाकटा भाऊ अशरफ याच्याशी वाद घालत असताना एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या प्रकरणातील धाडसी पोलीस अधिकारी धीरेंद्र राय यांच्या प्रयत्नांमुळे अतिकला तुरुंगात जावे लागलेच, शिवाय त्याच्या वडिलांनाही अटकेचा सामना करावा लागला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण याच विषयी जाणून घेऊ.
काय आहे प्रकरण?
गोष्ट आहे 90 च्या दशकातील. प्रयागराजच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन अंतर्गत अशोक साहू नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचा दोष एवढाच होता की, त्याने अतिकचा भाऊ अशरफ याच्याशी कुठल्या तरी कारणावरून वाद घातला होता. मात्र, अशोक साहू याला कल्पानाच नव्हती की, त्याने ज्याच्याशी वाद घातला तो अतिकचा भाऊ आहे. जेव्हा अशोक यांना कळलं की, आपण ज्याच्याशी वाद घातला तो, अतिकचा भाऊ आहे, तेव्हा अशोक साहू यांनी अतिकच्या घरी जाऊन त्याला माफी मागितली. मात्र तरीही अशोक साहू यांना खुलेआमपणे गोळ्या घालण्यात आल्या.
अतिकला अटक करणारे गुन्हे शाखेचे निवृत्त सीओ धीरेंद्र राय यांनी सांगितले की, अशोक साहूचे कुटुंब अतिकला इतके घाबरले होते की ते त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचे धाडसही करू शकले नव्हते. मात्र, पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहिले आणि नंतर पोलिसांच्या प्रयत्नाने साहू कुटुंबीयांनी अश्रफवर गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले. राय यांनी सांगितले की, यानंतर अतिकने आपल्या राजकीय प्रभावाने प्रकरण सीबीसीआयडीकडे वर्ग केले होते.
अतिकचे वडीलही आरोपी झाले
धीरेंद्र राय यांनी सांगितले की, तत्कालीन एसएसपी रजनीकांत मिश्रा यांनी तत्कालीन डीजीसीआयडीला विचारल्यानंतर तपास माझ्याकडे सोपवला होता. तपासादरम्यान असे आढळून आले की, घटनेच्या दिवशी अश्रफवर चंदौली पोलिस ठाण्यात खोट्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यानंतर पुरावे गोळा करण्यात आले आणि त्यात अतिकचेही मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आले. त्यानंतर अतीकच्या घराची झडती घेतली असता तिथून काही अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली, त्या आधारे अतीकच्या वडिलांनाही आरोपी करण्यात आले.
धमकी देऊनही मत डगमगले नाही राय
राय यांनी सांगितले की, एकदा तपासादरम्यान ते त्यांच्या बनारसच्या घरी होते आणि काही वस्तू घेण्यासाठी जवळच्या किराणा दुकानात गेले होते. किराणा दुकानदाराने त्याला सांगितले की काही लोक त्याच्या मोठ्या मुलाबद्दल विचारत आहेत. राय यांच्या प्रकरण काय आहे हे लक्षात आलं. त्याच तारखेला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना धमकीचा फोन आला. मात्र, त्यामुळे राय खचले नाहीत. तपासादरम्यान अतिकच्या प्रभावामुळे त्यांच्याकडून तपासाची जबाबदारीही काढून घेण्यात आली होती, मात्र तरीही राय त्यांच्या कामात गुंतला होते.
अतिकची अधिकार्यांपासून न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोच
तपासादरम्यान एकदा जेव्हा धीरेंद्र रायन यांनी अतिकला फोन केला, तेव्हा त्याने अतिक तिथे नसल्याचे सांगून फोन बंद केला. पण राय अतिकचा आवाज ओळखत होते. परिस्थिती ओळखून, अतिकने आपल्या राजकीय प्रभावाने प्रकरण दुसर्या अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केले. त्यांतर प्रकरण आपल्या बाजूने आहे हे समल्यावर अतिक निर्धास्त झाला. यानंतर राय यांनी अतिकच्या विश्वासू अधिकाऱ्याला फोन करून विश्वासात घेतले आणि अतिकचे लोकेशन जाणून घेतल्यानंतर तेथे पोहोचून माफियांना अटक केली. अतिकसोबत त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. कारण, त्यांच्या घरातून बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली होती.