फायनान्स बिल म्हणजे काय? अर्थसंकल्पातील घोषणांना कायदेशीर रूप देणारा कणा

केंद्रीय अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडताना ज्या विधेयकाला सोबत सादर करतात, त्यालाच फायनान्स बिल असं म्हटलं जातं.

Untitled Design (304)

Untitled Design (304)

What is a finance bill? : केंद्रीय अर्थसंकल्पत सादर होताच देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या एका दस्तऐवजाची होते, तो म्हणजे फायनान्स बिल. केंद्रीय अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडताना ज्या विधेयकाला सोबत सादर करतात, त्यालाच फायनान्स बिल असं म्हटलं जातं. देशाच्या कार्रचनेचा पाया असलेला हा दस्तऐवज आर्थिक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. फायनान्स बिल हा फक्त एक औपचारिक कागद नसून, देशातील करप्रणाली कशी असणार, सामान्य नागरिकांवर करांचा भार किती पडणार, उद्योग-व्यवसायांना कोणत्या सवलती मिळणार आणि सरकारचा महसूल कसा वाढणार, या सगळ्यांचा संपूर्ण आराखडा यातून स्पष्ट केला जातो.

या विधेयकात आयकर, कॉर्पोरेट कर, जीएसटीसह अप्रत्यक्ष कर, सीमा शुल्क, अधिभार, उपकर, करवसुली, करमाफी, नवीन कर प्रस्ताव तसेच करदरांमध्ये होणारे बदल तपशीलवार नमूद केलेले असतात. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात येणाऱ्या सर्व करांसंबंधी घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी फायनान्स बिलाला संसदेची मंजुरी आवश्यक असते. महत्वाचं म्हणजे, अर्थमंत्र्यांनी भाषणात केलेल्या घोषणा केवळ धोरणात्मक असतात, मात्र फायनान्स बिल मंजूर झाल्यानंतरच त्या घोषणा कायद्याचा भाग बनतात. त्यामुळेच संसदेत फायनान्स बिलावर होणारी चर्चा ही अत्यंत महत्वाची आणि कधी-कधी वादळी देखील ठरते.

खुशखबर! 30 लाख कोटींची गुंतवणूक, 40 लाख रोजगार निर्मिती; मुख्यमंत्री फडणवीसांची दावोसमधून घोषणा…

दरम्यान, यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार असून, हा त्यांच्या कार्यकाळातील आठवा अर्थसंकल्प असणार आहे. 2019 पासून सलगपणे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशातील सर्वाधिक काळ अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या महिलांपैकी एक ठरल्या आहेत. त्यांच्या आधीच्या अर्थसंकल्पांमध्ये आत्मनिर्भर भारत, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन आणि कल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकलपात आणि त्यासोबत येणाऱ्या फायनान्स बिलामध्ये कोणते नवीन करबदल, सवलती किंवा करसंकल्पना मांडल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महागाईचा दबाव, मध्यमवर्गीय करदात्यांच्या अपेक्षा, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक तसेच सामाजिक योजनांसाठी निधी, या सगळ्या बाबींचा थेट संबंध फायनान्स बिलामधील तरतुदींशी असतो. म्हणूनच अर्थसंकल्पातील आकड्यांइतकाच फायनान्स बिलाचा मजकूर देशाच्या आर्थिक भवितव्याला दिशा देणारा ठरणार आहे. संसदेत या विधेयकावर होणाऱ्या चर्चेनंतर आणि मंजूरीनंतरच सरकारच्या करधोरणांचा प्रत्यक्ष परिणाम देशातील नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.

Exit mobile version