Download App

ज्ञानवापी मशिदीचं करण्यात येणारं ASI सर्वेक्षण काय आहे? जाणून घ्या…

Varanasi Gyanvapi Mosque : अयोध्येत एकीकडे राम मंदिराची उभारणी होतेय. त्यामुळे धार्मिक वाद संपतील असं वाटत असतानाच वाराणसीतील ज्ञानवापी मशीदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. येथे मंदिर पाडून मशिद बांधण्यात आली. मंदिराचे पुरावे आढळले असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला. आता वाराणसी सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व खात्याने सर्वेक्षण (ASI) करण्याचे आदेश दिले आहेत. तर या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. तर मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश देण्यात आहेत. ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण काय आहे. ASI सर्वेक्षण म्हणजे काय हे सोपा विषयातून जाणून घेऊया… (What is ASI survey Varanasi Gyanvapi Mosque Supreme court Stay )

भाजप-मनसेचे वाद टोकाला : टोल नाक्यावरील तोडफोडीनंतर अमित ठाकरेंवरुन ‘ट्विटर वॉर’

ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण काय ?

वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरातच ज्ञानवापी मशिद आहे. ही मशिद मूळ मंदिराच्या जागेवर असल्याचा दावा हिंदू पक्षकाराकडून करण्यात आलाय. दिल्लीतील पाच महिलांनी वाराणसीच्या एका न्यायालयात 2021 मध्ये एक याचिका दाखल केली होती. या मशिद परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी या देवता आहेत. या देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मागितली होती. तेथून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.

किंगमेकर किंग होतो तेव्हा सगळे मिळून वाट त्याची लावतात, विखेंची ठाकरेंवर टीका

या मशिदीतील वजूखाना म्हणजे शिवलिंगच असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांकडून हा कारंजा असल्याचे सांगण्यात येते. कोर्टाच्या आदेशाने हा भाग सील केलेला आहे. अनेकदा याबाबत याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. तर तीन दिवसांपूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षण करण्यास आदेश दिले आहेत.

भारतीय पुरातत्व विभाग कधी स्थापन झाला ?

सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा भारतीय पुरातत्व विभाग म्हणजेच Archaeological Survey of India हा देशातील ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी काम करते. हा विभाग ब्रिटिश काळात. 1861 मध्ये हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. ताजमहाल, लाल किल्ला आणि कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तूंसह देशातील महत्त्वाच्या वास्तूंचे देखभाल, संवर्धन आणि इतर महत्त्वाची कामे ही ASI ची जबाबदारी आहे. याशिवाय देशाच्या कोणत्याही भागात पुरातत्व विभागाच्या वास्तू किंवा वस्तू आढळल्या तरी त्याची तपासणी एएसआयकडून केली जाते.

ASI च्या सर्वेक्षणात काय होते?

ही संस्था पुरातत्व सर्वेक्षण करते. त्यात जुन्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. यासाठी कार्बन डेटिंग, डेंड्रोक्रोनोलॉजी, एथनोक्रोनॉलॉजी, पुरातत्व उत्खनन, स्ट्रॅटिग्राफी या पद्धती वापरल्या जातात. कार्बन डेटिंगमुळे त्या वस्तूंचे वय कळते. ऐतिहासिक तथ्यांशी त्यांची जुळवाजुळव करून इमारत किंवा वस्तू कधी बांधली गेली याची खात्री केली जाते. अयोध्यातील राम जन्मभूमी व बाबरी मशिदवादामध्ये एसएसआयने सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणााच्या आधार घेत न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे एएसआय सर्वेक्षणाला कायदेशीर आधार आहे. त्यामुळे एसएसआय सर्वेक्षणाची भूमिका ज्ञानवापी मशिदप्रकरणातही महत्त्वाचे ठरू शकते. या सर्वेक्षणानंतर कोणत्या पक्षाचा दावा किती मजबूत आहे. याचे वैज्ञानिक पुरावे मिळतील. त्यामुळे गेल्या साडे तीनशे वर्षांपासून सुरू असलेला हा वाद एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय.

Tags

follow us