Download App

ढगफुटी म्हणजे काय, डोंगराळ भागात इतके ढग का फुटतात? जाणून घ्या सर्वकाही

What Is Cloudburst : उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) येथील धारली गावात ढगफुटी झाली असून या धढफुटीमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला

  • Written By: Last Updated:

What Is Cloudburst : उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) येथील धारली गावात ढगफुटी झाली असून या धढफुटीमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त लोक वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ढगफुटीमुळे खीर गंगा उसळली यामुळे राळी बाजार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. सध्या धारली गावात बचावकार्य सुरु असल्याची माहिती उत्तराखंड सरकारकडून (Uttarakhand Government) देण्यात आली आहे. पण नेमकं ढगफुटी (What Is Cloudburst) म्हणजे काय? आणि नेहमी डोंगराळ भागात अशा ढगफुटीच्या घटना जास्त का घडतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

ढग फुटणे म्हणजे काय?

जेव्हा जमिनीवरून उष्ण वारे ढगांकडे जातात तेव्हा त्यांच्यासोबत काही थेंबही वर जातात. अशा परिस्थितीत जितका पाऊस पडायला हवा तितका पाऊस पडत नाही. यामुळे ढगांमधील आर्द्रता खूप जास्त होते. जास्त वजनामुळे हवा देखील कमकुवत होते आणि हे वारे फार उंच जाऊ शकत नाहीत.  त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक लाख लिटर पाणी साचते. यामुळे अचानक ढग एकमेकांवर आदळतात आणि मुसळधार पाऊस पडतो. या नैसर्गिक घटनेला ढग फुटणे म्हणतात.

डोंगरी भागात जास्त परिणाम का होतो?

डोंगरी भागात हवेचा प्रवाह खूपच अरुंद असतो आणि हवेचा प्रवाह अरुंद असलेला भाग ढग फुटण्यास अनुकूल असतो. यामुळे हिमाचल, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि भारतातील ईशान्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी होत असते.

अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह येत्या 48 तासात पाऊस…, यलो अलर्ट जारी

ढग फुटण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य?

ढगफुटी एक अनपेक्षित आणि नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे रोखणे अशक्य आहे. मात्र जर लोकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे आणि सल्ल्याकडे लक्ष दिले, डोंगराळ भागात ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित केली आणि नदी किंवा उताराच्या ठिकाणी घरे बांधली नाहीत तर नुकसान कमी करता येते.

follow us