E20 Petrol : 1 एप्रिलपासून तुमची गाडी E20 पेट्रोलवर धावणार; नेमकं E20 काय, किती असणार किंमत?

What Is E20 Petrol 1 एप्रिल पासून देशभरातील पेट्रोल पंपांवर सर्व तेल कंपन्यांना E20 पेट्रोल विकणे बंधनकारक असेल.

E20 Petrol : 1 एप्रिलपासून तुमची गाडी E20 पेट्रोलवर धावणार; नेमकं E20 काय, किती असणार किंमत?

E20 Petrol : 1 एप्रिलपासून तुमची गाडी E20 पेट्रोलवर धावणार; नेमकं E20 काय, किती असणार किंमत?

What Is E20 Petrol How It Is Different From Regular Petrol : 1 एप्रिल 2026 पासून देशभरातील पेट्रोल पंपांवर एक मोठा बदल लागू होणार आहे. या बदलानुसार आता सर्व तेल कंपन्यांना E20 पेट्रोल विकणे बंधनकारक असेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण नेमकं E20 पेट्रोल काय, ते नियमित पेट्रोलपेक्षा कसे वेगळे आहे आणि यासाठी किती पैसे मोजावे लागणार? याबद्दल सोप्य शब्दात जाणून घेऊया…

E20 पेट्रोल नेमकं काय?

E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के नियमित पेट्रोल असते. इथेनॉल हे ऊस आणि मका यांसारख्या पिकांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून वितरित केल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलमुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे सरकारचे म्हणणे आहे. इथेनॉलचे ऑक्टेन रेटिंग जास्त आहे (सुमारे 108 RON), ज्यामुळे इंजिनमध्ये नॉकिंग कमी होते आणि वाहन स्मूथ चालते. नवीन नियमांनुसार इंजिनची कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी पेट्रोलची किमान RON रेटिंग 95 सणे आवश्यक आहे.

E20 पेट्रोलसाठी सरकार आग्रही का?

भारताने आधीच 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले असून, आता 2025-26 पर्यंत 20 टक्के ब्लेंडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रणामुळे 2014-15 पासून देशाचे अंदाजे 1.40 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. त्यात इथेनॉलचे उत्पादन देशांतर्गत केले जात आहे. यामुळे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाली असून, यामुळे शेतकऱ्यांनादेखील चांगला भाव मिळत आहे.

E20 पेट्रोलचा वाहनांवर काय परिणाम होणार?

2023 ते 2025 दरम्यान उत्पादित झालेली बहुतेक नवीन वाहने E20 इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. त्यामुळे, या वाहनांमध्ये कोणत्याही मोठ्या तांत्रिक समस्या अपेक्षित नाहीत. मात्र, जुन्या वाहनांचा मायलेज 3 ते 7 टक्के कमी होऊ शकतो. त्याशिवाय रबर आणि प्लास्टिकच्या भागांवर दीर्घकाळानंतर थोडासा परिणाम होऊ शकतो. पण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) यांनी केलेल्या अभ्यासात गाडीचे मोठे नुकसान नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरणावर काय परिणाम होणार?

नीती आयोगाच्या अहवालानुसार, ऊस आणि मक्यापासून बनवलेले इथेनॉल वापरल्याने ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 50 % ते 65 % पर्यंत कमी होऊ शकते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

E20 पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?


E20 पेट्रोलची किंमत राज्य आणि तेथील टॅक्सनुसार बदलू शकते. पण, असा अंदाज आहे की, वाहन चालकांना यासाठी अंदाजे प्रति लिटर 97 ते 106 रूपये मोजावे लागू शकतात.

Exit mobile version