महाकुंभात संगमस्थळी सर्वाधिक गर्दी, चेंगराचेंगरी झालेलं ‘संगम नोज’ ठिकाण नेमकं काय? जाणून घ्या

प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.

PRAYAGRAJ

PRAYAGRAJ

Prayagraj MahaKumbh Stampede Know What Is Sangam Nose : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभ पर्व सुरू आहे. तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभ आला आहे त्यामुळे येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. मौनी अमावस्येला महाकुंभात शाही स्नान होतं. त्यामुळे संगम तटावर स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. परंतु, मध्यरात्रीच्या वेळेस चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. संगम तटावर (संगम नोज) पळापळ झाली यात दहा जणांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता हे संगम नोज म्हणजे काय, असे कोणते ठिकाण आहे जिथे ही दुर्घटना घडली, या ठिकाणाचं इतकं का महत्त्व आहे, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील ना.. चला तर मग या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया..

काय आहे संगम नोज?

प्रयागराजमधील या ठिकाणाला संगम नोज असं नाव पडलं यामागेही खास तथ्य आहे. या ठिकाणाला त्याच्या आकारावरून हे नाव पडलं. स्नान करण्यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचं मानलं जातं. याच ठिकाणी यमुना, सरस्वती आणि गंगा या तीन नद्यांचा संगम होतो. बहुतांश साधू संत याच ठिकाणी स्नान करतात. भाविकही याच ठिकाणाला सर्वाधिक महत्व देतात.

महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेक भाविक जखमी, दहा जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द

संगम नोजचा परिसर दरवर्षी वाढविण्यात येत असतो. 2019 च्या तुलनेत यंदा वाढलेली गर्दी पाहता या परिसराचा आणखी विस्तार करण्यात आला होता. प्रत्येक तासाला किमान 50 हजार भाविक स्नान करतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली होती. परंतु, यावेळची गर्दी पाहता प्रत्येक तासाला दोन लाख भाविकांच्या स्नानाची व्यवस्था येथे करण्यात आली.

याच ठिकाणी जाण्यासाठी पळापळ

प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांची लगबग सुरू होती. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पळापळ सुरू झाली. नंतर प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत दुसरे मार्ग खुले केले आणि या गर्दीला डायव्हर्ट केलं. या उपाययोजनेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणता आली. आता येथील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सीएम योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साधू संत आणि भाविकांना आवाहन केलं. सध्याची परिस्थिती पाहता भाविक आणि साधू संतांनी संगम नोज ठिकाणी जाऊ नये. जिथे घाट आहेत त्याच ठिकाणी स्नाव करावे. मेळा क्षेत्रात स्नानासाठी अनेक घाट तयार करण्यात आले आहेत. तरी देखील संगम स्थळी जाण्यासाठीच गर्दी होत आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. या पवित्र ठिकाणी स्नान केल्यास पापं धुवून जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी स्नान करण्यासाठी तुडूंब गर्दी होत आहे.

प्रचंड गर्दी… महाकुंभात चेंगराचेंगरी कशी झाली? CM योगींनी थेट सांगितलं…

Exit mobile version