Download App

महुआ मोईत्रांची खासदारकी जाण्यामागे कारणीभूत असणारे हिरानंदानी कोण?

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी (cash for query) विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात आचार समितीच्या अहवालानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. महुआ मोइत्रावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. महुआ मोइत्रा यांनी पैसे घेतले आणि दर्शन हिरानंदानी (Darshan Hiranandani) आणि त्यांच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला. या संपूर्ण घडामोडींनंतर दर्शन हिरानंदानी आणि महुआ मोईत्रा खासदारकी रद्द प्रकरण नेमकं काय? यासंदर्भात जाणून घेऊयात….

Vijaypat Singhania यांनी देशातील प्रत्येक आई-वडिलांना दिलेला संदेश काय बोध देतो ? LetsUpp Marathi

महुआ मोइत्रा यांची संसदेतून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला असून, त्यासोबतच त्यांचे संसदेचे सदस्यत्वही संपुष्टात आले आहे. चर्चेदरम्यान भाजप खासदार हीना गावित यांनी सांगितले की, महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या संसदीय इतिहासात एकूण 61 प्रश्न विचारले, त्यापैकी त्यांनी दर्शन हिरानंदानी यांना 50 वेळा प्रश्न विचारले.

महुआने स्वत: नीती समितीसमोर कबूल केले की, आपण हिरानंदानी यांना लॉगिन आणि पासवर्ड दिला होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाव वारंवार समोर येत आहे ते म्हणजे दर्शन हिरानंदानी. कोण आहेत दर्शन हिरानंदानी? ते काय करतात आणि या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा कसा संबंध आहे?

विरोधकांच्या सभात्यागाचा सरकारने घेतला फायदा; कसिनो नियंत्रण विधेयक केलं मंजूर

दर्शन हिरानंदानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील ते मोठे नाव आहे. हिरानंदानी ग्रुपच्या रिअल इस्टेट कंपनीचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांना महुआ मोईत्रासोबत कॅश फॉर क्वेरीमध्ये जोडण्यात आले. अदानीबद्दल संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी महुआ मोईत्राला पैसे दिल्याचा आरोप दर्शनावर होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचे नाव समोर आले. दर्शनच्या कंपनीचा बहुतांश व्यवसाय मुंबईत आहे. दर्शनचे वडील निरंजन हिरानंदानी या कंपनीचे संस्थापक आहेत. हिरानंदानी समूह निवासी टाउनशिपपासून ते आयटी पार्क, बिझनेस पार्क, मॉल्सपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतलेला आहे.

दरम्यान, दर्शन यांच्या कंपनीचे अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेरही सुरू आहेत. मुंबईशिवाय बंगळुरू आणि चेन्नईमध्ये कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. रिअल इस्टेट व्यतिरिक्त, कंपनी डेटा सेंटर्स, तेल आणि वायू क्षेत्र, सेमीकंडक्टर आणि ग्राहक सेवांमध्ये वेगाने विस्तार करत आहे. हीनानंदानी ग्रुपचे दर्शन निदार ग्रुप, योट्टा डेटा सर्व्हिसेस, एच एनर्जी आणि तेज प्लॅटफॉर्मचे प्रमुख देखील आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.

Tags

follow us