Download App

दर तासाला दीड हजार तिकीट विक्री अन् एन्ट्री पॉइंट बेवारस.. चेंगराचेंगरीचं कारण सापडलं

नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही.

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी (New Delhi Railway Station Stampede) रात्री चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही असा आरोप आता होऊ लागला आहे.

या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. त्यांनी ही घटन नेमकी (Indian Railways) कशी घडली याची माहिती दिली. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती. परंतु प्लॅटफॉर्म 12,13,14 आणि 15 वर स्थिती अतिशय खराब झाली होती. रेल्वे थांब्याबाबत प्लॅटफॉर्मवरील नंबर बदलण्याची घोषणा सातत्याने होत होती त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेचे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 14 वर थांबलेली होती.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर; महाकुंभात जाण्यासाठी झाली होती गर्दी

ही रेल्वे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती. स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशिराने सुरू होत्या. या रेल्वेचे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर 12,13 आणि 14 वर हजर होते. गर्दी होईल याची आम्हाला कल्पना होती. परंतु, या गोष्टी अगदी काही सेकंदातच घडल्या. आता रेल्वे या घटनेची तपासणी करणार आहे. जबाबदारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर घटना कशी घडली याची माहिती आम्हाला कळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर दर तासाला दीड हजार तिकीट विक्री होत होती. याच कारणामुळे गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म 14 आणि प्लॅटफॉर्म 16 च्या एस्केलेटर जवळ चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती होती. रेल्वेने मात्र अफवा समजून ही गोष्ट नाकारली होती. आणि नवी दिल्ली स्टेशनवर झालेली स्थिती चेंगराचेंगरी सारखी स्थिती असे सांगितले. नंतर रेल्वेने स्पष्ट केले की अनेक लोक जखमी झाले आहेत.

भारतीय वायूसेनेतील सार्जंट अजित या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. अजित म्हणाले, रेल्वे स्टेशन परिसरात देशाच्या तिन्ही सेनांचे संयुक्त कार्यालय आहे. ज्यावेळी मी ड्यूटी करुन परत येत होतो. परंतु, मला कार्यालयात जाता आलं नाही. कारण तेथे प्रचंड गर्दी होती. मी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. प्लॅटफॉर्मवर गर्दी करू नका असे आवाहन मी लोकांना करत होतो. प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते परंतु कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी आणि माझ्या मित्राने जखमी लोकांची मदत केली.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की या घटनेत मी माझ्या आईला गमावलं. प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी सुरू झाली. प्लॅटफॉर्मवर नाही. मी माझ्या परिवारासह छपराला निघालो होतो. आम्ही पायऱ्यांवरून खाली उतरत होतो. प्लॅटफॉर्म सामान्यच दिसत होता. काही नियोजन नाही अशी परिस्थिती दिसत नव्हती. पण अचानक पायऱ्यांवर गर्दी झाली. लोक पळत पळतच पायऱ्या उतरत होते. यात धक्का लागून माझी आई आणि आणखी काही महिला खाली पडल्या. बाकीचे लोक त्यांना चिरडून पुढे निघून गेले.

follow us