Download App

सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्याला काय शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? जाणून घ्या…

Throw Shoe At Chief Justice सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यात आला या वकिलाला काय शिक्षा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

What punishment for Attempt To Throw Shoe At Chief Justice Bhushan Gavai In Supreme Court : सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. (CJI) सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. त्यामुळे आता या वकिलाला काय शिक्षा होणार? काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यात खळबळ! आमदार बापूसाहेब पठारे यांच्या ड्रायव्हरची बंडु खांदवे विरोधात पोलिसांत तक्रार

ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी घटना आहे. त्यामुळे आता या प्रकरणी या वकिलाला भारतीय कायद्यानुसार कंटेंट ऑफ कोर्स १९७१ नुसार जर एखादी व्यक्ती न्यायालयाच्या मर्यादांच्या उल्लंघन करत असेल.हवामान कारक वर्तन करत असेल न्यायाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणत असेल.तर त्याला शिक्षा होऊ शकते.संविधानाच्या कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की ते न्यायालयाच्या अवमानासंबंधीच्या प्रकरणांमध्ये स्वतः कारवाई करू शकते.

शरद पवारांनी आमचं वाटोळ केलं पण…, मनोज जरांगे पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून थेट वार

अशाप्रकारे न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.दुसरीकडे या कायद्यामध्ये दिलासा देखील देण्यात आला आहे.जर आरोपीने त्याची चूक स्वीकार केली किंवा माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाला त्याचा हा पश्चाताप खरा आहे. असं वाटलं तर यातील त्याचे शिक्षा कमी केली जाऊ शकते किंवा ही शिक्षा रद्द देखील केली जाऊ शकते.अन्यथा ही शिक्षा भोगणे हा एकच पर्याय आरोपीकडे असतो.

धक्कादायक बातमी! सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

दुसरीकडे भारतीय न्याय संहितेच्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने सुनावणी दरम्यान एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा सेवकाला अवमानकारक विधान किंवा वर्तन केलं असेल तर कलम 267 नुसार त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा या दोन्हीही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान कारक घटनेप्रमाणे या अगोदरही घटना घडली आहेत त्यांना शिक्षा देखील करण्यात आली आहे त्याचबरोबर माफ देखील करण्यात आलेला आहे.

follow us