Live Updates: (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) आज सादर केला.
देशात 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी चांगली बातमी दिली आहे. सोबत आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे.
सीतारामन यांच्या भाषणातल्या संपूर्ण घोषणा आणि अपडेटसाठी वाचा
हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प आहे.
आजच्या बजेटवर काँग्रेस पक्षाने एका चित्राच्या माध्यमातुन टीका केली. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नरेंद्र मोदींचा योगासन करतानाचा फोटो ट्विट केला आहे. केंद्र सरकार दावा करताना आलेख वर गेल्याचं सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात आलेख खाली जात आहे. असा चित्र या फोटोमध्ये दिसून येत आहे.
बजट खत्म हुआ
Claim Reality pic.twitter.com/MEDSXINZHR
— Congress (@INCIndia) February 1, 2023
रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो - मुख्यमंत्री @mieknathshinde #Budget2023
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 1, 2023
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी करधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची
(income tax) मर्यादा सात लाख इतकी केली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
https://letsupp.com/national/finance-minister-nirmala-sitharaman-made-a-big-announcement-for-taxpayers-/9421.html
प्रत्येक राज्यातील ज्या भागात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा भागात म्हणजे विभागनिहाय डाळींसाठी ‘विशेष हब’ तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना (Farmer) वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच त्यांना बाजारभाव देखील चांगला मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतरामन (Nirmala Sitaraman) यांनी केली.
https://letsupp.com/national/nirmala-sitaramn-union-budget-/9407.html
अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली.
https://letsupp.com/latestnews/after-the-budget-the-stock-market-rose-and-then-fell-/9450.html
गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारत यावर मोठा भर दिलाय.
वाचा सविस्तर
https://letsupp.com/national/how-will-the-rupee-come-and-go-read-in-detail-/9457.html
अर्थमंत्र्यांनी सगळ्यात मोठा दिलासा कररचनेत वाढवण्यात आलेल्या स्लॅबच्या रुपाने मिळाला आहे. हे वाचणारे पैसे बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून येतील.
अस असलं तरी विरोधकांकडून बजेटबद्दल चांगलं बोलण्याची अपेक्षा नव्हती. अस मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
या अर्थसंकल्पामुळे महिलांचा सन्मान वाढला, तरुणांसाठी डिजिटल लायब्ररीच्या घोषणेने जिल्हास्तरावर मुले वाचतील आणि प्रगती करतील याचा उल्लेख करण्यात आला. आजचा अर्थसंकल्प म्हणजे स्त्रीशक्ती मजबूत राष्ट्र कसे घडवू शकते याचे प्रतिबिंब आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी